Dhoni Retirement: ‘या’ सामन्यानंतर धोनी आयपीएलमधून घेणार निवृत्ती ! CSK अधिकाऱ्याने दिला मोठा अपडेट

Published on -

Dhoni Retirement: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू एमएस धोनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आम्ही तुम्हाला सध्या धोनी आयपीएलमध्ये खेळत आहे. मात्र सोशल मीडियावर धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. चला मग जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे आणि धोनी आयपीएलमधून खरंच निवृत्ती घेणार आहे का ?

चेन्नई सुपर किंग्जच्या एका अधिकाऱ्याने दावा केला आहे कि धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार आहे . यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. क्रिकेटमध्ये ‘थला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीसाठी हा आयपीएलचा शेवटचा हंगाम ठरू शकतो.

तो 14 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शेवटचा सामना खेळू शकतो. जर CSK प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही, तर IPL मधील धोनीचा निरोपाचा सामना कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) विरुद्ध होऊ शकतो. धोनी 2008 पासून म्हणजेच सुरुवातीच्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सांभाळत आहे.

MS-Dhoni-CSK-Sportzpics-social

CSK अधिकाऱ्याने दावा केला

चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकाऱ्याचा हवाला देत इनसाइड स्पोर्ट या वेबसाइटने म्हटले आहे की, “होय, खेळाडू म्हणून एमएस धोनीचा हा शेवटचा हंगाम असेल. आतापर्यंत आम्हाला मिळालेली ही माहिती आहे. अर्थात हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याने संघ व्यवस्थापनाला अधिकृतपणे आपण निवृत्ती घेणार असल्याचे सांगितलेले नाही. चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की आयपीएल चेन्नईत परत येत आहे परंतु धोनी आपला शेवटचा हंगाम खेळेल हे आमच्यासाठी चांगले होणार नाही.

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग IPL च्या आगामी हंगामाचे (IPL-2023) वेळापत्रक शुक्रवारी जाहीर झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या प्रतिष्ठित T20 लीगच्या 16 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. हंगामातील पहिला सामना 31 मार्च रोजी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. त्याच वेळी, अंतिम सामना 28 मे रोजी खेळवला जाईल.

हे पण वाचा :-  Mercury Gochar 2023 : शनीच्या राशीत बुध करणार प्रवेश ; ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार प्रत्येक कामात यश !

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe