अहमदनगर :- जामखेड येथे काल कोरोना बाधीत आढळलेल्या २ व्यक्तींपैकी एकाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले.
जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे एकाच दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ५ ने वाढली आहे. सकाळी संगमनेर येथील ०४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या.
काही दिवसापूर्वी मृत्यु पावलेल्या जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन युवकांना काल लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले होते.
त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®