Diabetes Control Tips ; मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्यात जर रुग्णांनी आहाराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर या रुग्णांनी काळजी घेतली नाही तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका जास्त असतो. तसेच त्यामुळे वाईट परिणाम होतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मधुमेहावर कोणताही उपचार नसून आहार, जीवनशैली आणि औषधांच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवावे लागते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी अशा पदार्थांचे सेवन करावे ज्यात भरपूर फायबर आणि पोषक असतात. यापैकी एक गोष्ट म्हणजे केशर होय.
या कारणामुळे बिघडते मधुमेही रुग्णांचे आरोग्य?
मधुमेह आणि हायपरग्लायसेमियामुळे प्रोइनफ्लेमेटरी सूक्ष्म वातावरण तयार होऊन शरीरात नेफ्रोपॅथी, रेटिनोपॅथी आणि न्यूरोपॅथी यासारख्या गुंतागुंत निर्माण होतात.
केशर ठरते गुणकारी
एका संशोधनानुसार, मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी जर केशर खाल्ले तर त्यांच्या शरीरातील दाहक मार्ग सुधारतात.
असतात बरेच औषधी गुणधर्म
केशर ही एक औषधी गुणधर्म असलेली वनस्पती असून जी विशेषत: पूर्वेकडील देशांमध्ये आणि मध्य पूर्वमध्ये घेतली जाते. देशात याचे उत्पादन काश्मीरमध्ये होते. त्यामुळे यालाच ‘केसर’ असेही म्हटले जाते. जे हर्बल औषध म्हणून काम करते, यात सॅफ्रानल, फ्लेव्होनॉइड्स, क्रोसेटिन आणि क्रोसिन सारखे घटक असतात, ज्यामुळे तणाव आणि जळजळ दूर होते. जे मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी धोकादायक आहे.
झाले संशोधन
यावर संशोधन झाले असून ज्यामध्ये इनव्हिट्रो, प्राणी आणि नैदानिक चाचणीद्वारे मधुमेहाच्या रूग्णांमध्ये जळजळीवर केशरचा परिणाम तपासला गेला. 596 पैकी 20 लेख प्रकाशित झाले ज्यात 3 इनव्हिट्रो, 13 प्राण्यांवर आणि 4 मानवी अभ्यासाचे होते.
ही समोर आली तथ्ये
1. दाहक बायोमार्कर मधुमेहाशी निगडित गुंतागुंतीसाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे संशोधनात असे आढळून आले आहे.
2. केशराचा वापर करून अशा रुग्णांना भविष्यातील समस्यांपासून वाचवता येते.
… त्यामुळे केशर खावे
संशोधन लेखक म्हणाले, “या अभ्यासाचे परिणाम असे सूचित करतात की केशर पूरक आणि त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म मधुमेहाच्या रूग्णांमध्ये दाहक मार्ग रोखू शकतात.” त्यामुळे केशर खावे.
केशरची किंमत जास्त का असते?
देशातील फक्त जम्मू-काश्मीरमधील काही जिल्ह्यांत केशरचे उत्पादन घेण्यात येते, बाकीचे परदेशातून निर्यात केले जाते. त्यामुळं केशरची किंमत खूप जास्त असते. भारतात 1 किलो केशरसाठी 1 लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात.