Shivsena Symbol : ..तर निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द होऊ शकतो!! घटनातज्ञांनी सांगितले नाव आणि चिन्हाचे पुढेचे सगळे गणित..

Published on -

Shivsena Symbol : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिले आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. असे असताना आता पुढची रणनीती कशी असायला पाहिजे, याबाबत उद्धव ठाकरे चाचपणी करत आहेत. असे असताना आता घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. 

ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होईपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय द्यायला पाहिजे नव्हता. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर कोणताही परिणाम होणार नाही. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निवडणूक आयोगाच्या निकालावर परिणाम होऊ शकतो.

तसेच गेल्या १० वर्षात पहिल्यादांच निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षित नव्हता, असेही त्यांनी म्हटले आहे. फक्त आमदार आणि खासदारांच्या संख्येवर निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. मात्र, पक्ष संघटनेला जास्त महत्व आहे. पक्षाचं चिन्ह, नाव आणि विचारांवर सदस्य निवडून येतात. असेही ते म्हणाले.

तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये, असं माझं मत होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयाने विरुद्ध निर्णय दिल्यास निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय रद्द होईल, असं मत उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने विरुद्ध निर्णय दिल्यास निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय रद्द होईल, असे मत उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे. निवडणुकीत सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि नेता काय म्हणतो याला महत्व नाही. तर, जनता काय म्हणते याला महत्व आहे, असेही उल्हास बापट यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News