तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर : तालुक्यातील पेमगिरी येथील रामदास बबन जेडगुले (वय ३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. १४) सकाळी साडेसात वाजेच्या पूर्वी घडली.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पेमगिरी याठिकाणी रामदास जेडगुले हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते.

मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या पूर्वी त्यांनी आपल्या राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

त्यांना औषधोपचारासाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता औषधोपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment