अहमदनगर क्राईम न्यूज : केंद्रीय राखीव दलाच्या जवानास मारहाण

Ahmednagarlive24
Published:

पाथर्डी : माळीबाभुळगाव शिवारातील शिक्षक कॉलनी येथे केंद्रीय राखीव दलातील जवान मच्छद्रिं चंद्रकांत बडे यांना चौघांनी मारहान करुन गंभीर जखमी केले आहे.

बुधवारी कॉलनीत झालेल्या या मारामारीमुळे जिल्हा पोलिस दल चांगलेच कामाला लागले आहे. पाथर्डीत गोळीबार झाल्याची चर्चा सोशल मिडीयातून सुरु झाली आणि जो-तो कोरोना विसरुन केवळ गोळीबाराची चौकशी करीत होता.

पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील, पोलिस उपअधिक्षक मंदार जवळे, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी, सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत पवार, दिलीप राठोड, उपनिरीक्षक परमेश्वर जावळे

यांच्यासह दंगल नियंत्रक पथक, श्वानपथक, ठसेतज्ञ असा सुमारे शंभर जणांचा पोलिसांचा फौजफाटा बुधवारी रात्री सात ते पहाटे पाच वाजेपर्यंत राबत होता.

मच्छद्रिं बडे हे जम्मू काश्मीर येथे सीआरपीएफच्या १७७ बटालियनमधे नेमणुकीस आहेत. मागील महिन्यात ते एक महिन्याच्या सुट्टीवर गावी पाथर्डीत आले. सुट्टी संपली मात्र लॉकडाऊनमुळे ते कर्तव्यावर हजर होवु शकले नाहीत.

बुधवारी शिक्षक कॉलनीतील एका जुन्या बांधकामाजवळ चूल करुन मटन शिजवुन जेवन करीत असताना मच्छद्रिं बडे व केतन जाधव, राम जाखव, गौरव पैठणकर, सागर पैठणकर यांच्यात किरकोळ वाद झाला.

त्यांनतर चार वाजण्याच्या सुमारास बडे यांनी रेतीवरील प्लास्टिकचा पाईप उचलला त्यावेळी तेथे जेवत असलेल्या राम जाधव यांच्या ताटात माती गेली याचा राग धरुन केतन जाधव याने बडे यांच्या हातातील प्लास्टिकचा पाईचा हिसकावुन घेवुन त्यानेच बडे यांना मारहान केली.

पैठणकर बंधु व राम जाधव यांनीही शिवगाळ करुन मारहाण केली. अक्षय जायभाये याने सोडवा सोडव केली. बडे हे घरी गेले . केतन जाधव व पैठणकर बंधु व राम जाधव यांनी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा दुपारी झालेल्या भांडणाचा रागधरुन बडे यांना अनाधिकाराने घरात घुसुन मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली गंभीर जखमी केले.

बडे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौघे फरार झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment