मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव : शहरातील सुभाषनगर येथे मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारीचा प्रकार घडला असून दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असून याप्रकरणी सात जणांविरूद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

मुजाहिद मज्जीद कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (दि. २२) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर सुभाषनगर येथील आरोपी योगेश संजय शिंदे,

संजय रामभाऊ शिंदे, सिद्धार्थ संजय दुशिंग यांनी मागील भांडणाच्या कारणावरून त्यांना व साक्षीदारांना संगनमत करून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व आरोपी नंबर एक याने फिर्यादीचे डोक्यात दगड फेकून मारून त्यांना जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर क्रमांक १४०/२०२० नुसार भा.दं.वि. कलम ३२४, ३३७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरे फिर्यादी योगेश संजय शिंदे (वय २६, रा. सुभाषनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे

की, बुधवारी (दि. २२) रात्री ८ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोरील रस्त्यावर आरोपी मुजाहिद मजिद कुरेशी, अन्सार गफर कुरेशी, जब्बर गफर कुरेशी,

उजेब मजीद कुरेशी (सर्व रा. आयेशा कॉलनी सुभाषनगर) यांनी मागील भांडणाच्या कारणावरून फिर्यादी व साक्षीदार यांना संगनमत करून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व आरोपी नंबर एक याने फिर्यादीचे दोन्ही पायावर व पाठीत लाकडी दांड्याने जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर क्रमांक १४१/२०२० नुसार भारतीय दंड विधान कलम ३२४, ३३७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment