Panjabrao Dakh : पंजाबरावांचा 2023 चा मान्सून अंदाज आला रे…! यंदा असा राहणार मान्सून; पडणार सरासरीपेक्षा…..

Ajay Patil
Published:

Panjabrao Dakh : गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या हवामान विभागाकडून नैऋत्य मान्सूनबाबत मोठी माहिती देण्यात आली. अमेरिकन हवामान विभागाने एक अहवाल सार्वजनिक केला असून या अहवालानुसार एल निनो हवामान प्रणालीचा नैऋत्य मान्सूनवर प्रभाव राहणार असल्याचे सांगितले गेले. यामुळे भारतात कमी पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवण्यात आला. यामुळे भारतात सर्वत्र हाहाकार माजला आहे. एलनिनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, दुष्काळासारखी परिस्थिती तयार होईल असा तर्क वितर्क लावला जाऊ लागला आहे.

दरम्यान भारतीय हवामान तज्ञांनी आत्ताच एल निनो संदर्भात भविष्यवाणी करणे चुकीचे राहील असं सांगितले आहे. तर काही हवामान तज्ञांनी एल निनो अथवा ला लिना याचा फेब्रुवारी, मार्च महिन्यात अंदाज बांधला तर हा अंदाज कायमच चुकीचा ठरतो असं नमूद केलं असून भूतकाळात देखील याचा अनुभव आला आहे. तसेच काही तज्ञांनी एल निनो जरी सक्रिय राहिला तरी फारशी चिंता करण्याची काही कारण नाही.

कारण की, आतापर्यंतच्या अनुभवानुसार जर दहा वेळा एलनीनो सक्रिय राहिला असेल तर यापैकी पाच वेळा समाधानकारक पाऊस भारतात झाला असल्याची माहिती दिली आहे. अशातच आता जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील या संदर्भात एक मोठी माहिती दिली आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 25 ते 26 तारखेपर्यंत थंडीचा जोर राहणार आहे. यानंतर मात्र उन्हाचा पारा वाढणार आहे. दरम्यान 28 फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडे राहणार असून गहू उत्पादक आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काही कारण नाही असे देखील त्यांनी सांगितले.

सध्या राज्यात रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा सोंगणीचे, काढणीचे कामे काही ठिकाणी केली जात असून येत्या काही दिवसात ही कामे राज्यातील जवळपास सर्वच भागात पाहायला मिळणार आहेत. यामुळे निश्चितच आगामी काही दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करताना अडचण भासणार नसल्याचे चित्र आहे. याशिवाय पंजाबरावांनी एलनिनो संदर्भात बोलताना सांगितलं की, सध्या वृत्तपत्रात आणि न्यूज चैनल्समध्ये एलनिनो संदर्भात मोठ्या चर्चा रंगत आहेत.

अनेक ठिकाणी दुष्काळासारखी आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल अशा बातम्या दाखवल्या जात आहेत. मात्र, भारतीय मान्सूनवर एलनिनोमुळे प्रभाव पडणार नसल्याचे मत पंजाब रावांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर गेल्यावर्षी अर्थातच 2022 मध्ये ज्या पद्धतीने पाऊस झाला आहे तसाच पाऊस 2023 मध्ये देखील होईल असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe