लॉकडाऊन मध्ये माजीमंत्री राम शिंदे करत आहेत ही कामे

Ahmednagarlive24
Published:

जामखेड – माजी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे लॉकडाऊनमुळे सध्या आपल्या मूळ गावी चौंडी येथील घरी आहेत. तसेच दूरध्वनीवरून गरजूंना रेशनचे धान्य मिळण्यासाठी, तसेच उद्‌भवलेल्या परिस्थितीतील समस्या सोडवण्यासाठी अधिकारी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्याही संपर्कात आहेत.

तसेच आपला वाचन, बागकामाचा छंदही जोपासत आहेत. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे चौंडी येथील निवासस्थानी वडील शंकरराव, आई भामाबाई, पत्नी आशाबाई, मुली अक्षता आणि अण्विता व मुलगा अजिंक्‍य यांच्या समवेत वास्तव्यास आहेत.

विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतरही प्रा. शिंदे खचले नसून, त्यांची जनहिताची कामे सुरूच आहेत. पराभव जिव्हारी लावून न घेता विजयी उमेदवाराचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. भल्या पहाटे त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. नियमित प्राणायाम, योगा करत आहेत.

बंगल्याच्या आवारात विविध रंगांची फुले आणि फळझाडे आहेत. त्यास सकाळीच पाणी देत आहेत. तसेच घरातील छोट्या-मोठ्या कामांतही मदत करत आहेत. मधल्या वेळात देशभक्तीपर गीते विरंगुळा म्हणून जुनी गाण्याचे श्रवण करत आहेत.

जामखेड शहरात करोनाबाधित रुग्ण आढळल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आपली आणि कुटुंबाची काळजी घ्या, आपण सर्वजण मिळून करोनाला हद्दपार करू, असा धीर देत आहेत. दिवसभरात सुमारे 200 ते 300 नागरिकांना दूरध्वनी करून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment