पशुपालकांसाठी खुशखबर ! भारतीय संशोधकांचा कौतुकास्पद शोध; आता चोरी झालेली जनावरे एका मिनटात सापडतील, ‘या’ 5 हजाराच्या मशीनने होणार हे शक्य

Ajay Patil
Published:

Animal Husbandry : भारतात गेल्या अनेक वर्षांपासून पशुपालन व्यवसाय केला जात आहे. शेतीशी निगडित व्यवसाय असल्याने शेतकरी या व्यवसायाला अधिक पसंती देत आहेत. विशेष बाब म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराने आता पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सिद्ध होत आहे. वेगवेगळ्या नवनवीन तंत्रज्ञानाच्या आणि यंत्रांच्या जोरावर आता पशुपालन व्यवसायात देखील शेतकऱ्यांना चांगली प्रगती साधता येत आहे.

दरम्यान भारतीय संशोधकांनी असा एक कौतुकास्पद शोध लावला आहे ज्याच्या मदतीने पशुपालक शेतकऱ्यांना चोरी झालेली जनावरे शोधता येणार आहेत. एवढेच नाही तर या नवीन शोधामुळे आता जनावरांना कोणता आजाराचा धोका आहे किंवा कोणता आजार होऊ शकतो याची देखील माहिती पशुपालकांना मिळू शकणार आहे.

हे सर्व काही शक्य होणार आहे ते केवळ एका मशीनने. काऊ मॉनिटर सिस्टम असं या यंत्राचे नाव असून या यंत्राचा शोध एका भारतीय संस्थेने लावला आहे. इंडियन डेअरी मशिनरी कंपनीने लावलेल्या या शोधामुळे भारतीय पशुपालन क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. या संस्थेने विकसित केलेलं हे काऊ मॉनिटर सिस्टम यंत्र पट्ट्या सारखे असून याला पशुच्या गळ्यात घालता येणार आहे. या काउ मॉनिटर सिस्टम मध्ये या संस्थेने एक जीपीएस ट्रॅकर बसवला आहे.

ज्याच्या मदतीने जनावर कुठे हिंडतय याची कल्पना पशुपालकांना येऊ शकणार आहे. यामुळे जर जनावर चोरी झाले असतील तर अशी जनावरे शोधण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. याशिवाय हे भन्नाट यंत्र जनावरांच्या पायावरून आणि त्यांच्या हालचालीवरून जनावरांना कोणते आजार होऊ शकतात याचा देखील अंदाज बांधणार आहे. म्हणजेच यामुळे जनावरांना अद्याप न झालेले मात्र होणारे आजार ओळखता येणार आहेत.

यामुळे पशुपालकांना वेळेतच अशा जनावरांची काळजी घेता येणे शक्य होणार आहे. निश्चितच गेल्या काही महिन्यांपासून लंपी या आजारामुळे पशुपालकांना मोठा फटका बसत आहे. मात्र या नवीन यंत्रामुळे साथीच्या आजारांचा तसेच लंपी सारख्या आजाराची वेळेतच माहिती पशुपालकांना होणार असल्याने जनावरांना आजारापासून यामुळे दूर ठेवता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जनावरांच्या गळ्यात घातल्या जाणाऱ्या या बेल्टमुळे दहा किलोमीटरच्या परिघात जनावर कुठे आहे याचा शोध घेता येणार आहे म्हणजे दहा किलोमीटरच्या परिघात जनावरांचे लोकेशन ट्रॅक करता येणार आहे.

एवढेच नाही तर या पट्ट्यामुळे जनावरांच्या गर्भधारणे बाबत देखील माहिती मिळवता येऊ शकणार आहे. शिवाय या बेल्ट मध्ये जी काही बॅटरी बसवण्यात आली आहे ती तीन ते पाच वर्षे अविरत सुरू राहणार आहे. याची किंमत चार ते पाच हजार रुपये असू शकते असा अंदाज काही मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आला आहे. येत्या तीन ते चार महिन्यात हा बेल्ट बाजारात दाखल होऊ शकतो असं देखील सांगितलं जात आहे. निश्चितच यामुळे पशुपालकांना मोठा फायदा होईल यात तीळ मात्र देखील शंका नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe