Agriculture News : सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाच्या माध्यमातून कायमच वेगवेगळ्या योजना आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अशातच आता सातबारा उतारे तसेच इतर तत्सम सुविधेसाठी शासकीय कार्यालयात फेरफटका मारावा लागू नये, यामुळे शेतकऱ्यांसहित सामान्य नागरिकांचा वेळ खर्च होऊ नये यासाठी अमरावती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एक नवीन प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
आता जिल्ह्यातील नागरिकांना सातबारे व इतर तत्सम सुविधा किऑस्क मशीनच्या साहाय्याने केवळ एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. या सुविधेचा लाभ घेण्याचे आव्हान देखील यानिमित्ताने केले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या मशीनचे उद्घाटन जिल्हाधिकारी प्रमुख कौर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.

या मशीन मुळे नागरिकांना सातबारा उताऱ्या सारख्या अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी महोदय यांनी शेतकऱ्यांना तसेच सामान्य नागरिकांना महत्त्वाच्या शासकीय कागदपत्रांसाठी शासकीय अधिकाऱ्यांकडे जावे लागू नये यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून किऑस्क मशीन विकसित करण्यात आली आहे. ही सातबारा किऑस्क मशीन शेतकऱ्यांसहीत सामान्य नागरिकांना उपयुक्त ठरेल असा विश्वास देखील यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी व्यक्त केला.
किऑस्क मशीन मध्ये कोणत्या सुविधा राहतील
अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी नुकत्याच सुरू केलेल्या या मशीनमध्ये साक्षांकित जुने सात-बारा, कोतवाल पुस्तक, गाव नमुना आठ-अ, पेरे पत्रक, नोंदणी, जुने फेरफार, जन्म आणि मृत्यू रजिस्टर, कढई पत्रक तसेच ऑनलाइन सात-बारा या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी महोदय यांनी दिली आहे.
निश्चितच, नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य नागरिकांसहित शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रशासनाच्या माध्यमातून कायमच प्रयत्न होत असतात. अमरावती जिल्हा प्रशासनाकडून देखील असाच काहीसा प्रयत्न झाला असून यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. वास्तविक, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या शासकीय योजनेसाठी कायमचा सातबारा उतारा व तत्सम कागदपत्रांची आवश्यकता असते.
अशा परिस्थितीत ही नवीन सुविधा त्यांच्यासाठी फायदेशीर राहणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून ऑलरेडी शेतकऱ्यांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. मात्र यामध्ये इतरही अन्य सुविधा देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे ही नव्याने सुरु झालेली सुविधा शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी फायद्याची राहील असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.













