खानदेशातील शेतकऱ्याचा नादखुळा ! पपई शेतीतून मिळवले एकरी सहा लाखांचे उत्पन्न; असं आखलं होतं नियोजन, ‘या’ जातीची केली लागवड, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:
papaya farming

Papaya Farming : राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे मोठा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळ, यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असं उत्पादन मिळवता येत नाहीये. शिवाय या संकटांचा सामना करून शेतकऱ्यांनी जो काही शेतमाल उत्पादित केलेला असतो त्याला देखील बाजारात चांगला तर मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळतं नाही.

यावर्षी तर कांदा, कापूस सोयाबीनला बाजारात अपेक्षित असा भाव नाही. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. याशिवाय वांगी आणि बटाटे देखील कवडीमोल दरात विक्री होत आहे. परंतु या अशा परिस्थितीत केळी आणि पपई या पिकाला चांगला दर मिळत आहे. केळीची आणि पपईची खानदेशात सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. त्यामुळे खानदेशातील शेतकऱ्यांना या पिकाच्या शेतीतून चांगली कमाई होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील पपई शेतीतून एकरी सहा लाखांचे उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. जळगाव जिल्ह्यातील मौजे करंज येथील प्रदीप जगन्नाथ पाटील यांनी आपल्या मात्र एक एकर शेत जमिनीत पपईचे शेती सुरू केली. त्यांच्याकडे एकूण तीन एकर शेत जमीन आहे मात्र त्यांनी एका एकरात पपई लागवड केली आहे. पपईच्या व्हीएनआर 15 या सुधारित वाणाची त्यांनी लागवड केली आहे. प्रदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पपई लागवड करण्यापूर्वी त्यांनी जमिनीची चांगली मशागत करून घेतली.

नागरणी आणि नंतर रोटावेटर करून पपई लागवडीसाठी शेत तयार केले. यानंतर दहा बाय सहा अंतरावर पपईच्या 750 रोपांची लागवड त्यांनी केली. लागवडीनंतर बेसल डोस दिला. यामध्ये सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा वापर त्यांनी केला आहे. पपई पिकाला पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला आहे. पपई पिकाला रोजाना दोन ते चार तास पाणी त्यांनी दिले आहे.तसेच बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची फवारणी करत पपई भागाची चांगली जोपासना केली आहे.

योग्य जोपासना आणि नियोजन केल्यामुळे त्यांना पपईच्या पिकातून चांगले उत्पादन मिळाले आहे. पपईच्या प्रत्येक झाडाला 75 किलो एवढा मान तयार झाला आहे. आतापर्यंत चार वेळा त्यांनी पपई बागेतून काढणी केली आहे. यामध्ये त्यांना 25 टन पर्यंत उत्पादन आतापर्यंत मिळाला आहे. पपईच्या व्ही एन आर 15 जातीला चांगली मागणी असल्याने त्यांच्या पपईला पंधरा रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे. म्हणजेच आतापर्यंत पावणे चार लाख रुपयांची कमाई त्यांना झाली असून खर्च वजा जाता सव्वा 3 लाख रुपये निव्वळ नफा त्यांना राहिला आहे.

प्रदीप यांच्या मते या बागेतून आणखी तीन ते चार वेळा काढणी शक्य होणार आहे. म्हणजेच आणखी एवढेच उत्पादन त्यांना मिळणार आहे. अशा पद्धतीने एक एक पपई बागेतून त्यांना सहा लाखांपर्यंतची कमाई होण्याची शक्यता आहे. निश्चितच प्रदीप यांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी इतरांसाठी प्रेरक राहणार आहे. बाजारपेठेचा आढावा घेऊन फळबाग पिकांची शेती सुरू केली तर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते हेच प्रदीप यांनी दाखवून दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe