Aadhar Card : आजच्या काळात प्रत्येक गोष्टींसाठी पैसा खूप महत्त्वाचा झाला आहे. त्यामुळे आता कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर पैसे मोजावे लागत आहेत. परंतु, अनेकदा फक्त नोकरीतून मिळणाऱ्या पगारात खर्च भागला जात नाही. त्यामुळे अनेकजण कर्जाने पैसे घेतात.
आता बऱ्याच बँकांनी पर्सनल लोनसाठीची प्रक्रिया खूप सोपी केली असून तुम्हाला आता फक्त आधार कार्डच्या मदतीने लोनसाठी अर्ज करता येईल. त्यामुळे जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हे कर्ज असे घ्यायचे ते जाणून घ्या.

असा करता येईल कर्जासाठी अर्ज
नंबर 1
- तुम्हालाही काही कामासाठी कर्ज घ्यायचे असल्यास तुम्हाला आधी प्ले स्टोअरवर जावे लागणार आहे.
- या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेचे अॅप डाउनलोड करावे लागणार आहे किंवा जे तुम्हाला कर्ज देऊ शकेल
- हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे.
नंबर 2
- त्यानंतर एंटर तुम्ही केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, ज्याच्या मदतीने तुम्हाला लॉगिन करावे लागणार आहे.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचे कर्ज हवे आहे ते निवडावे लागणार आहे.
- येथे तुम्हाला तुमची माहिती विचारली जाईल, जसे की नाव, पत्ता इत्यादी सर्व भरावी लागणार आहे.
नंबर 3
- तुम्ही सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक विचारला जाईल.
- येथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक इथे टाकावा लागणार आहे.
- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत म्हणजेच आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP येईल, तो या ठिकाणी टाकावा लागणार आहे.
नंबर 4
- तुम्ही ओटीपी टाकल्यानंतर तुमचा आधार पडताळला जाऊन तुमची सर्व माहिती कर्ज देणाऱ्या अॅपवर शेअर केली जाईल.
- यानंतर तुम्हाला तुमची पात्रता जाणून घेऊन कर्जासाठी अर्ज करता येईल.
- अर्ज केल्यानंतर काही वेळानंतर तुम्हाला कर्ज दिले जाईल.