Chana Procurement : हरभऱ्याला मिळणार 5,335 रुपयाचा हमीभाव; ‘या’ बाजारात सुरू झाली नोंदणी, ‘ही’ लागणार कागदपत्रे, वाचा डिटेल्स

Ajay Patil
Published:
Chana Procurement

Chana Procurement : हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता रब्बी हंगामात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात हरभरा या नगदी पिकाची शेती केली जाते. पुणे जिल्ह्यातही याची शेती मोठ्या प्रमाणात पहावयास मिळते. सद्यस्थितीला हरभरा उत्पादकांनी आपला हरभरा काढण्यास सुरवात केली आहे. अनेकांनी हार्वेस्टिंग, मळणी करून हरभरा घरी देखील आणला आहे.

काही शेतकरी बांधव पैशांची निकड असल्याने हरभरा विक्री देखील करत आहेत. खुल्या बाजारात मात्र शेतकऱ्यांचा हरभरा अपेक्षित अशा भावात विक्री होत नव्हता. राज्यातील काही बाजारात हरभरा हमीभावापेक्षा कमी दरात विकला जात होता. दरम्यान आता पुणे जिल्ह्यातील बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती मधून शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे.

बाजार समितीच्या माध्यमातून हमीभावात हरभरा खरेदीसाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच आता नोंदणीकृत शेतकऱ्यांचा हरभरा 5,335 रुपये प्रतिक्विंटल या हमीभावात खरेदी होणार आहे. नाफेडच्या माध्यमातून बाजार समितीमध्ये हा हरभरा हमीभावात खरेदी केला जाणार असून यासाठी नोंदणी प्रक्रिया एक मार्च ते 15 मार्च या कालावधीमध्ये पार पडणार आहे.

यामुळे अधिकाधिक हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये हमीभावात हरभरा विक्रीसाठी नोंदणी करावी असं आवाहन बाजार समितीच्या माध्यमातून केले जात आहे. बारामती एपीएमसी चे सचिव अरविंद जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी वेळेत हरभरा हमीभावात विक्री करण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे राहणार आहे. तसेच हरभरा विक्रीसाठी आणताना स्वच्छ आणि वाळवून आणावा असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे

बारामती व परिसरातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी बाबालाल काकडे, निरा कॅनॉल संघ, तीन हत्ती चौक, बारामती या ठिकाणी नोंदणी करावी. नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. त्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा उतारा, ऑनलाइन पीक पेरा, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe