अहमदनगर ब्रेकिंग : साखर कारखान्याला आग लागून सुमारे 35 कोटी रुपयांचे नुकसान !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 :- संगमनेर तालुक्यातील युटेक शुगर या साखर कारखान्याच्या गोदामाला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे 35 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

आज पहाटे ही घटना घडली आगीने रौद्र रूप धारण केल्याने संगमनेर, प्रवरानगर येथील सहकारी साखर कारखाने, देवळाली प्रवरा व राहुरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

ज्वलनशील पदार्थ अधिक असल्याने आग भडकली. या आगीच्या झळा साखर सोठवलेल्या गोदाम क्रमांक 1 पर्यंत पोचल्या.संगमनेर व प्रवरानगर व देवळाली प्रवराचे बंब आल्यानंतर पहाटे सव्वापाचच्या सुमारास आग नियंत्रणात आली.

या आगीमुळे कारखान्याच्या गोदामातील यंत्रांचे सुटे भाग, प्लॅस्टीक गोण्या, इलेक्ट्रिक केबल, आदी जळून गेले. साखर गोदामातील 92 हजार 507 क्विंटल साखरेचे आग व पाण्यामुळे नुकसान झाले.

संगमनेर तालुक्यातील साकूर भागात असलेल्या कौठेमलकापूर भागात हा कारखाना उद्योजक रविंद्र बिरोले यांनी 2012 साली सुरु केला होता.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment