PM Candidate : 2024 मध्ये उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना देणार टक्कर? पंतप्रधान पदाबाबत संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

Published on -

PM Candidate : सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधी पक्षाने मोट बांधण्यास सुरवात करणं गरजेचे आहे. यासाठी शिवसेना पुढाकार घेण्यास तयार आहे. तसेच ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात यावे, अशी आमची इच्छा आहे, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

तसेच आज जे विरोधी पक्षामध्ये मुख्य चेहरे आहेत, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अधिक महत्वाचा आहे. उद्धव ठाकरे हे एक उत्तम चेहरा आहे. महाविकास आघाडीने ठरवलं होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतील तरच आपण एकत्र येऊ, असेही राऊत म्हणाले.

त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार बनलं. तसेच ते म्हणाले, 2024 बाबत आताच सांगणे कठीण आहे. मात्र राजकारणात काहीही घडू शकतं. महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे. त्यामध्ये ते ठाकरे असून हिंदुत्ववादी आहेत, असेही राऊत यांनी सांगितले आहे.

यामुळे आता राजकीय चर्चा रंगू लागली आहे. सध्या ठाकरे गट फुटला असून अनेक आमदार हे शिंदे यांच्याकडे गेले आहेत. तसेच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण देखील एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. यामुळे सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News