Motorola 5G smartphone : स्मार्टफोनप्रेमींसाठी आनंदाची बातमी! Motorola चा 5G स्मार्टफोन मिळतोय ‘इतक्या’ स्वस्तात

Published on -

Motorola 5G smartphone : जर तुम्ही मिड-रेंज सेगमेंटमध्ये स्मार्टफोन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. Motorola ने काही दिवसांपूर्वी G सीरीज लाँच केली होती. अशातच आता या सीरीजचा लोकप्रिय स्मार्टफोन Moto G62 5G च्या किमती कंपनीने खूप कमी केल्या आहेत.

कंपनीचा हा स्मार्टफोन 6 GB आणि 8 GB अशा दोन स्टोरेजमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या किमतीत 5,000 रुपयांनी कपात करण्यात येत आहे. इतकेच नाही तर वापरकर्त्यांना आता यावर 1,000 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येत आहे.त्यामुळे स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी गमावू नका.

जाणून घ्या Moto G62 फीचर आणि स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये, कंपनी 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.55-इंच फुल एचडी+ डिस्प्ले देत असून जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशोला सपोर्ट करतो. स्टोरेजचा विचार केला तर कंपनी या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देत आहे. या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट दिला आहे. गरज भासली तर मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्ही फोनची मेमरी 1 टीबीपर्यंत वाढवू शकता.

फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येत आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सरसह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटरचा समावेश आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.

साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी असून ही बॅटरी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. जोपर्यंत OS चा संबंध आहे, हा फोन Android 12 वर आधारित MyUX वर काम करतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe