वेड्या लेकरांची वेडी ही माया ! शेतकरी बापाच्या कष्टाची आठवण म्हणून बैलजोडीसह उभारला पुतळा; वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:

Satara News : आपल्या भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे. निश्चितच आई आणि वडील आपल्यासाठी देवासमानच असतात, त्यांच्या सेवेने फलश्रुती होते. असं सांगतात की आई लेकरांना कडेवर घेते आणि तिची जिथपर्यंत दृष्टी पोहोचते तिथपर्यंत ते आपल्या मुलांना जग दाखवते, मात्र वडील आपल्या लेकरांना खांद्यावर बसवतो आणि जो ते काही आपल्या जीवनात पाहू शकला नाही ते आपल्या लेकरांनी पहावं असा त्याचा मानस असतो.

सातारा जिल्ह्यातील खिंगर येथील किसन दुधाने हे देखील अशेच एक पिता होते ज्यांनी आपल्या तीन लेकरांना खांद्यावर बसवून त्यांनी जे बघितले नाही ते त्यांच्या लेकरांनी पहावं म्हणून कायमच प्रयत्न केलेत. आपल्या लेकरांसाठी त्यांनी काळ्या आईच्या सेवेत संपूर्ण आयुष्य वेचल. शेती करून आपल्या संसाराचा गाडा हाकला. मुलांना चांगले संस्कार दिलेत आणि आपल्या पायावर उभे करून या जगताचा निरोप घेतला.

यामुळे आपल्या या कष्टकरी बापाची आठवण म्हणून त्यांचं स्मरण म्हणून अनिल, संजय आणि धनंजय या तिन्ही भावंडांनी आपल्या पिताची म्हणजे कैलासवाशी किसन दुधाने यांचा बैल जोडी सह पुतळा उभारला आहे. हा एक पूर्णाकृती पुतळा असून या तिन्ही भावंडांनी आपल्या वडिलांची पोकळी भरून काढण्यासाठी हा एक केलेला छोटासा प्रयत्न आहे. या तिन्ही भावंडांचे मात्र पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक केले जात आहे. बापाच्या कष्टाची जाण म्हणून या दुधाने बंधूंनी केलेले हे काम पिता पुत्रांचे नाते किती घट्ट असते आणि पिता आपल्या पुत्रांसाठी किती विशेष असतो हेच अधोरेखित करत आहे. खरं पाहता किसन दुधाने यांनी बहु कष्टाने खिंगरसारख्या छोट्याशा गावात शेती फुलवली. शेतीमध्ये काबाडकष्ट करत मुलांना मोठ केलं.

सामाजिक राजकीय तसेच शेतीच्या क्षेत्रात देखील मोठे मोलाचे योगदान त्यांनी दिलं. एवढेच नाही तर त्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केलेत इतर शेतकऱ्यांना देखील नवनवीन प्रयोग शिकवलेत. इतर शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ कशी घडवून आणता येईल यासाठी त्यांना मार्गदर्शन दिलं. स्ट्रॉबेरी मध्ये त्यांनी मोठ संशोधन केलं या कामी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळाला. निश्चितच किसन दुधाने यांचे हे काम कौतुकास्पद होतं. म्हणून त्यांच्या या लेकरांनी त्यांच्या आठवणी जोपसण्यासाठी हा त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe