Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांच्यात मोठा वाद सुरू आहे. शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यात टोकाची कटुता निर्माण झाली आहे. हीच कटुता कमी करण्याच्या दिशेला आता भाजपने एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशीच वक्तव्य केली आहेत. यामुळे आता भविष्यात भाजप आणि ठाकरे यांच्यातील वाद कमी होणार का असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत फडणवीस म्हणाले, आमच्या मित्रांना कुणीतरी भांग पाजला होता.
विरोधकांनी असा नशा करण्यापेक्षा आता चांगली कामे करावीत, असा सल्ला त्यांनी दिलाय. आम्ही त्यांना आधीच माफ केलं आहे. आमच्या मनात आता कोणतीही कटुता नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
तसेच चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, संजय राऊतांनी मतभेद आणि मनभेद विसरुन काम कराव, मी संजय राऊत यांना विनंती करेन की त्यांनी आजपासून मनभेद आणि मतभेद बाजूला सारुन एकत्रितपणे महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम कराव, यामुळे भाजप नेत्यांची भाषा काहीशी मवाळ झाली आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि सध्याच्या शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते राज्यभरात जाहीर सभा घेऊन भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधणार आहेत. यामुळे आता महाराष्ट्र भाजपची वाटचाल उद्धव ठाकरेंसोबतची कटुता कमी करण्याच्या दिशेला होताना दिसत आहे.