Maharashtra Budget 2023 : राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठी भेट दिली आहे. विधानमंडळात आज अर्थसंकल्प मांडला जात असून या अर्थसंकल्पमध्ये राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धरतीवर एका मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे.
या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. देशभरातील जवळपास आठ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. राज्यातही ही योजना कार्यान्वित असून राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होत आहे. एका आकडेवारीनुसार राज्यातील जवळपास एक कोटी शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळत आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दोन हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने वितरित केले जातात. दरम्यान, आता याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील एक योजना सुरु होणार आहे. नुकतीच अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा केली आहे.
या योजनेअंतर्गत आता राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जाईल असं सांगितलं जात आहे. निश्चितच पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6000 रुपयाचा लाभ सध्या स्थितीला राज्यातील शेतकऱ्यांना मिळतच आहे आता त्याच धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना शिंदे फडणवीस सरकार सुरू करणार आहे.
याची घोषणा अर्थसंकल्पात झाली असून याबाबत लवकरच सर्व निकष आणि पात्रता याबाबतची माहिती समोर येणार आहे. निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी असून यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा अधिक लाभ मिळणार आहे हे नक्की.