Weather Update : आज पासून महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ पाहत होते. आज राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात हवामान कोरडच राहिलं. तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान पहावयास मिळाले मात्र प्रामुख्याने राज्यातील हवामान आज कोरडे राहिले. अशातच पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या मते 14 मार्चपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान खराब होईल आणि पाऊस तसेच गारपीट होईल. खरं पाहता खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई रब्बी हंगामातून भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. विशेष म्हणजे रब्बी हंगामात चांगलं पोषक वातावरण पिकांसाठी लाभल होत.

मात्र 4 मार्च पासून महाराष्ट्रात वातावरणात मोठा बदल झाला आणि राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने, गहू, हरभरा, कांदे तसेच फळ पिकांमध्ये द्राक्ष, डाळिंब, पपई केळी यांसारख्या पिकांची मोठी हानी झाली. आजपासून मात्र हवामान कोरडे होत होतं. अशातच पुन्हा एकदा विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
14 मार्चपासून विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. नागपूर हवामान विभागाने विदर्भात 14 ते 17 मार्च दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज बांधला आहे. विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात या कालावधीमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत निश्चितच भर पडणार आहे.
नुकतेच 5 मार्च ते 8 मार्च दरम्यान बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील काढणीसाठी आलेल्या पिकांचे नुकसान झाले असल्याने हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांपासून हिरावून घेतला असल्याचे चित्र असतानाच पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता आहे.