Laptop Tips : चुकूनही ऑफिसच्या लॅपटॉपवर करू नका या चार चुका, नाहीतर सिस्टम होईल हॅक

Published on -

Laptop Tips : आजकाल लॅपटॉपचा वापर प्रत्येक घरातच होताना आपल्याला दिसत असेल. ऑफिसच्या कामापासून ते ऑनलाईन शिक्षणापर्यंत अनेक कामांसाठी लॅपटॉपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. जर तुम्ही तुमच्या ऑफिसच्या लॅपटॉपवर काही चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा.

कारण तुमचा लॅपटॉप सहज हॅक होऊ शकतो. जर तुम्हाला तुम्हाला तुमचा लॅपटॉप हॅक होऊ द्यायचा नसेल तर यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. या टिप्स तुमच्यासाठी खूप फायद्याच्या आहेत. या टिप्स कोणत्या आहेत पाहुयात सविस्तरपणे.

या चुका टाळा

वैयक्तिक माहिती जतन करणे

अनेक जण ऑफिसच्या लॅपटॉपचा वापर त्यांच्या वैयक्तिक कामासाठी करून त्यात त्यांची वैयक्तिक माहिती जतन करतात. जर तुम्ही असे करत असाल तर आत्ताच सावध व्हा. कारण लॅपटॉप हॅक झाला तर तुमचा डेटा लीक होऊ शकतो आणि चुकीच्या हातातही जाऊ शकतो.

बँकिंग माहिती ठेवणे टाळा

अनेकजण नेट बँकिंग आयडी, पासवर्ड आणि एटीएम पिन यासारखी बँकिंग माहिती ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये लिहून ठेवतात. चुकूनही हे करू नका. नाहीतर तुम्ही खूप मोठ्या अडचणीत येऊ शकता.

चुकीच्या पेजला भेट देऊ नका

जेव्हा तुम्ही गुगलवर काही शोधता तेव्हा तुम्ही कोणत्या वेबसाइटला भेट देत आहात आणि वेबसाइट तुमच्याकडून कोणत्या परवानग्या मागत आहे हे नक्की लक्षात ठेवा. तसेच ज्या वेबसाइटवर विश्वासार्हता नाही, त्या पेजला चुकूनही परवानगी देऊ नका.

अज्ञात लिंक्सपासून सावध

अनेकजण ऑफिसच्या लॅपटॉपवर व्हॉट्सअॅप किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उघडतात. परंतु हे लक्षात ठेवा की जर तुम्हाला लॉटरी, भारी सवलत, कर्ज इत्यादी सारखी कोणतीही अज्ञात लिंक आली तर त्यावर चुकूनही क्लिक करू नका कारण या लिंक्सद्वारे हॅकर्स तुमच्या लॅपटॉपमधून माहिती सहज चोरू शकतात. फसवणूक करणारे तुम्हाला ईमेलवरही अशा काही लिंक पाठवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News