Jio Launches 5G Services : जिओचा 5G धमाका! देशातील 27 शहरांमध्ये सुरु केली 5G सेवा, महाराष्ट्रातील या शहरांचा समावेश

Ahmednagarlive24 office
Published:

Jio Launches 5G Services : रिलायन्स जिओ टेलिकॉम कंपनीकडून ग्राहकांसाठी दिवसेंदिवस अनेक सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा होत आहे. तसेच जिओकडून ग्राहकांना आकर्षक ऑफर देखील दिल्या जात असल्याने जिओचे ग्राहकही वाढत आहेत.

आता रिलायन्स जिओकडून भारतामध्ये 5G सेवा लॉन्च करण्यात आली आहे. पण ही सेवा संपूर्ण भारतभर सुरु झालेली नाही. चाचणीसाठी जिओकडून अनेक राज्यामध्ये 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांचा जिओ 5G सेवेमध्ये समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सातारा शहराचा 5G सेवेमध्ये समावेश

रिलायन्स जिओने देशभरातील विविध २७ शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली आहे. यामध्ये नव्याने महाराष्ट्रातील सातारा शहराचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील १७ शहरांमध्ये जिओ 5G सेवा सुरु करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील अकोला, परभणी, अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड-वाघाळा, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर आणि सातारा या शहरांचा 5G नेटवर्कमध्ये समावेश करण्यात आला आहे.

रिलायन्स जिओचे शार आणि गावात 5G सेवा सुरु करण्याचे लक्ष

जिओकडून सध्या 5G सेवा चाचणी म्हणून सुरु करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातील 27 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे.

जिओकडून ही 5G सेवा ग्राहकांना मोफत वापरण्यासाठी देण्यात येत आहे. यासाठी कंपनीकडून कोणताही शुल्क आकारण्यात येत नाही. जिओ ग्राहक 1 Gbps वेगाने अमर्यादित डेटाचा आनंद घेऊ शकतात.

प्रत्येक व्यावसायिक वापरकर्त्याला Jio 5G सेवेचा लाभ मिळावा अशी आमची इच्छा आहे. या वर्षाच्या अखेरीस प्रत्येक शहर आणि गावात 5G सेवा सुरू करण्याचे जिओचे उद्दिष्ट आहे असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe