Agneeveer Yojana: अग्निवीर योजनेंतर्गत अर्ज केलेल्या आणि सीमेवर 4 वर्षे सेवा केलेल्या अर्जदारांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने अग्निवीर योजनेंतर्गत देशसेवा केलेल्या उमेदवारांना सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) भरतीमध्ये 10 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. यासोबतच पहिल्या बॅचच्या माजी अग्निवीरांनाही उच्च वयोमर्यादेत 5वर्षांची सूट देण्यात येणार आहे.
माजी अग्निवीरांना बीएसएफ भरतीमध्ये आरक्षण
केंद्रीय गृह मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे ही घोषणा केली आहे. गृह मंत्रालयाने 6 मार्च रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की बीएसएफमधील रिक्त पदांपैकी दहा टक्के पदे माजी अग्निवीरांना राखीव असतील.
वयातही सूट मिळेल
कॉन्स्टेबलच्या भरतीमध्ये माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचच्या उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा पाच वर्षांनी कमी करण्यात येईल, असे अधिसूचनेत सांगण्यात आले आहे आणि त्यानंतरच्या बॅचला वयात तीन वर्षांची सूट मिळेल.
फिजिकल टेस्ट पासूनही दिलासा
गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, माजी अग्निवीरांना फिजिकल टेस्ट मधूनही सूट दिली जाईल. यासाठी गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दल, जनरल ड्युटी कॅडर भरती नियम, 2015 मध्ये सुधारणा केली आहे, जी गुरुवारपासून (9 मार्च) लागू झाली आहे.
हे पण वाचा :- SBI Offers : एकच नंबर ! एसबीआय देत आहे दरमहा 90 हजार रुपये कमवण्याची संधी ; फक्त करावे लागेल ‘हे’ काम