Cycle Price : काय सांगता! 89 वर्षांपूर्वी सायकल होती फक्त इतक्या रुपयांना, 1934 सालचे बिल झाले व्हायरल…

Ahmednagarlive24 office
Published:

Cycle Price : जगात दिवसेंदवस प्रगती होत चालली आहे. मात्र काही वर्षांपूर्वी आता जे बदल झाले आहेत किंवा प्रगत तंत्रज्ञान आले आहे हे ८९ वर्षांपूर्वी काहीच नव्हते. त्यामुळे त्याकाळी सायकल हे एक दळणवळणाचे साधन होते. मात्र त्याकाळी किंमत देखील खूपच कमी होती.

आजकाल तुम्हाला सायकलचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येईल. लोकांना आजकाल सायकल चालवायला आवडत नाही त्यामुळे १८ वर्षाच्या मुलापासून ते वृद्धापर्यंत बाईक, कार दिसते. आजच्या युगात सर्वच कामे जलद गतीने करावी लागतात.

त्याकाळी सायकलची किंमत कमी होती मात्र आता महागाईमुळे सायकलची किंमतही वाढली आहे. मात्र त्याकाळी सायकलची किंमत कमी असूनही सर्वसामान्य नागरिक खरेदी करू शकता नव्हते. त्याकाळी सायकलची किंमत किती होती हे तुम्हाला व्हायरल झालेल्या सायकलच्या बिलावरून समजेल.

दिनांक 7 जानेवारी 1934

हे बिल नुकतेच सोशल मीडियावर अनेक युजर्सनी शेअर केले आहे. जर बिलावर लिहिलेल्या तारखेकडे पहिले तर त्यावर 7 जानेवारी 1934 ही तारीख लिहिली आहे, म्हणजेच ते सुमारे 89 वर्षे जुने बिल आहे.

हे व्हायरल बिल कोलकाता येथील सायकल शॉपचे आहे. बिलावर कुमुद सायकल वर्क्स असे दुकानाचे नाव लिहिले आहे. आजचा कोलकाता त्या काळी कलकत्ता असायचा. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या बिलावर सायकलची किंमत फक्त 18 रुपये लिहिली आहे.

किंमत स्पष्टपणे दिसत आहे

आज सायकलच्या किमती हजारोंच्या घरात पोहचल्या आहेत. पण त्या काली फक्त १८ रुपयांना सायकल मिळत होती. व्हायरल झालेल्या बिलामध्ये तुम्हाला दुकानाचा पत्ता, नाव आणि सायकलची किंमत स्पष्ट दिसेल.

आता एवढ्या रुपयांत पंक्चरही होत नाही!

हे बिल समोर येताच आजच्या काळापासून लोक त्यावर चर्चा करू लागले. लोकांचा असा विश्वास आहे की 2023 मध्ये एवढ्या पैशात सायकलचे पंक्चरही होणार नाही. आणि अनेक दुकानांमध्ये सायकल पंक्चर केले जात नाही हे देखील खरे आहे.

काही वापरकर्त्यानी असे म्हंटले आहे की 1934 मध्ये सायकल ही अभिमानाची सवारी मानली जात होती. याचे कारण म्हणजे फार कमी लोकांकडे सायकल होती आणि प्रत्येकाला ती विकतही घेता आली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe