Nokia C12 : स्वस्तात मस्त! नोकियाने भारतात लॉन्च केला स्वस्त स्मार्टफोन, किंमत आहे 6000 रुपयांपेक्षाही खूपच कमी

Published on -

Nokia C12 : भारतीय टेक बाजारात नोकियाने आपला आणखी एक स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन आहे. जर तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कंपनीचा नवीन स्मार्टफोन तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता.

कंपनीने Nokia C12 स्मार्टफोन बाजारात आणला असून तुम्ही आता तो 6000 रुपयांपेक्षाही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही ऑफर फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळे चुकनही अशी चांगली संधी गमावू नका.

कंपनीच्या Nokia C12 या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.3-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. या फोनमध्ये AndroidTM 12 (Go Edition) आहे, जो 20 टक्के अधिक मोफत स्टोरेजचा दावा करत आहे. इतकेच नाही तर यासोबतच 2 GB व्हर्चुअल रॅम उपलब्ध आहे.नोकियाच्या या फोनमध्ये Unisoc 9863A1 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

तर कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये ब्लूटूथ 5.2, 3.5mm हेडफोन जॅक, मायक्रो USB, WiFi: 802.11 b/g/n, वायरलेस रेडिओ आणि वायर रेडिओ दोन्ही दिले आहेत. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी असून जी फोन मधून काढता येते.

Nokia C12 चा सेल भारतात सुरु झाला असून कंपनीच्या Nokia C12 च्या 2 GB RAM सह 64 GB स्टोरेजची किंमत 5,999 रुपये ठेवली आहे आणि हा फोन डार्क शिऑन आणि लाइट मिंट कलरमध्ये खरेदी करता येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या किंमतीत हा फोन 17 मार्चपर्यंतच खरेदी करता येणार आहे, म्हणजेच ही लॉन्चिंग किंमत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News