अहमदनगर ब्रेकिंग : सारीसदृश आजाराने एकाचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- पारनेर तालुक्यातील हंगे येथील शेतमजुराचा काल सारीसदृश आजाराने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश वासू (मूळ रा. वाशिम) असे मृत्यू झालेल्या शेतमजुराचे नाव आहे.

नगर येथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. पारनेर तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. मात्र, तालुक्यात सारीचा प्रवेश झाला आहे.

मूकबधिर असलेला गणेश वासू हा आजारी पडल्याने त्याला पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तीव्र ताप आल्याने उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वासू याची कोरोना चाचणी करण्यात आली. परंतुु तिचा अहवाल निगेटीव्ह आला होता. यानंतर त्याला पुन्हा नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment