Panjabrao Dakh Monsoon Update : गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारी 2023 रोजी परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक हवामान अंदाज वर्तवला होता. त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 4 मार्च ते 10 मार्च राज्यात पावसाची शक्यता होती. त्यावेळी त्यांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. चार मार्च ते 10 मार्च यादरम्यानच्या कालावधीत राज्यात बहुतांशी जिल्ह्यात अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला.
विशेष म्हणजे त्यांनी त्यावेळी धुळे नंदुरबार जळगाव नासिक अहमदनगर पुणे छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती. झालं देखील तसंच 10 मार्चपर्यंत त्यांनी सांगितलेल्या बहुतांशी जिल्ह्यात पाऊस पडला. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यात गारपिट झाली होती त्याचा देखील त्यांनी अंदाज बांधला होता.
हे पण वाचा :- Breaking : अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा अन ‘त्या’ जिल्ह्यात गारपीट होणार…
दरम्यान 9 मार्च रोजी त्यांनी पुन्हा एकदा आपला हवामान अंदाज जारी केला या हवामान अंदाजात त्यांनी 14 मार्चपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता असल्याचे सांगितले. 14 मार्च रोजी उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडेल असा त्यांनी अंदाज बांधला होता. झालं देखील तसंच काल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे तसेच इतरही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे.
अशा परिस्थितीत, आजपासूनच हवामान कसे राहील याबाबत पंजाबराव डख यांनी काय अंदाज वर्तवला आहे याविषयी जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांसहित सामान्य जनतेमध्ये उत्सुकता पहावयास मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण पंजाबराव डख यांनी जारी केलेला नवीन हवामान अंदाज जाणून घेणार आहोत.
पंजाबराव ढक यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार आज, 15 मार्च विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. यासोबतच उद्यापासून ते 19 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडणार आहे. तसेच ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला त्या ठिकाणी वादळी वारा निश्चितच वाहील असे देखील पंजाबरावांनी स्पष्ट केले.
हे पण वाचा :- पंजाबराव डख : 14 मार्चपासून अहमदनगर, नासिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, नांदेड, लातूर अन…
‘या’ जिल्ह्यात पडणार पाऊस
डखं यांच्या मते 19 मार्चपर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे. पण पावसाची तीव्रता 16, 17 आणि 18 मार्च रोजी सर्वाधिक राहणार आहे. या कालावधीमध्ये यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, नाशिक, निफाड, नंदुरबार या भागात पाऊस पडणार आहे. विशेष बाब म्हणजे तेलंगाना, आंध्र प्रदेश, यवतमाळ, नांदेडसह पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीटीची शक्यता पंजाब रावांनी वर्तवली आहे.
या कालावधीमध्ये पडणारा पाऊस हा सहसा दुपारी किंवा रात्रीच्या कालावधीमध्ये पडणार आहे. यामुळे लग्नसराईचा सीजन असल्याने लग्नकार्य वेळेत काढण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला डखं यांनी दिला असून शेतकरी बांधवांना मुसळधार पाऊस आणि गारपीटीची शक्यता लक्षात घेता आपले शेती पिक आणि पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे राहणार आहे.
हे पण वाचा :- तिखट मिरचीने आणला गोडवा ! दीड एकरात मिळवलं 20 टन उत्पादन; झाली 6 लाखांची कमाई, वाचा ही यशोगाथा