Nana Patole : सध्या राज्यात जुन्या पेंशनवरून सरकारी कर्मचारी हे संपावर गेले आहेत. यामुळे सर्व यंत्रणा ठप्प झाली आहे. यामुळे हा वाद कधी मिटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता आम्ही सत्तेत आलो तर जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
काँग्रसेच्या ताब्यात असणाऱ्या हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यामध्ये आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू व्हावी असे पटोले म्हणाले. यामुळे सध्याचे सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/03/ahmednagarlive24-Capture-134.jpg)
नाना पटोले म्हणाले, आता देशावर संकट आले आहे, अशा परिस्थिती देशावर संकट आणणाऱ्या व्यवस्थेविरोधात सगळ्यांची मोट बांधण्याची काँग्रेसची भूमिका आहे. भाजपकडून ज्याप्रकारे सत्तेचा गैरवापर सुरु आहे. याप्रकाराला थांबवले पाहिजे, असेही ते म्हणाले.
भाजपला दूर ठेवण्यासाठी एकला चलो रे ची भूमिका सोडल्याचा पुनरुच्चार नाना पटोलेंनी केला आहे. काँग्रेसने सगळ्यांना सोबत घेण्याचे काम आतापर्यंत केले आहे. देशासाठी काँग्रेसने समर्पण केल्याचे पटोले म्हणाले.
भाजपविरोधात जे कोणी असतील ते सर्वच लोक महाराष्ट्रात एकत्र घेऊ. आमचे तळ्यात-मळ्यात अशी भूमिका नसल्याचे नाना पटोले म्हणाले. देशाची संविधान व्यवस्था वाचली पाहिजे, त्यासाठी आमचा पुढाकार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.