WhatsApp Group Admin Privacy Policy : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनने चुकूनही करू नये या पाच चुका, अन्यथा तुम्हाला खावी लागणार जेलची हवा


व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनवर खूप जबाबदाऱ्या असतात. जर त्यांनी याच्याकडे लक्ष दिले नाही तर त्यांना तुरुंगात जावे लागेल.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

WhatsApp Group Admin Privacy Policy : जगभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. अशातच अनेकांना एकत्र जोडण्यासाठी म्हणजेच आपले मित्र किंवा मोठ्या गटांशी कनेक्ट होण्यासाठी व्हाट्सअ‍ॅप ग्रुप वापरतात.

प्रत्येक ग्रुपमध्ये एक किंवा जास्त ग्रुप अ‍ॅडमिन असतात. या ग्रुप अ‍ॅडमिनच्या अनेक जबाबदाऱ्या असतात. ग्रुपमधील प्रत्येक सदस्यावर त्याचे लक्ष असते. अशातच आता व्हाट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनने काही चुका केल्या तर त्याच्यावर आता कारवाई केली जाणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात.

अनेकजण मित्र, कुटुंब किंवा मोठ्या गटांशी कनेक्ट होण्यासाठी व्हाट्सअ‍ॅप ग्रुप वापरत आहेत. या ग्रुपमध्ये मुख्य अ‍ॅडमिन शिवाय, इतर अनेक अ‍ॅडमिन बनवता येतात, जे अनेक विशेष अधिकारांसह येतात. ग्रुपमध्ये कोणाला अ‍ॅड करायचे आणि कोणाला ग्रुपमधून काढून टाकायचे हे ते ठरवू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनवर अनेक जबाबदाऱ्या असून यामध्ये ग्रुपमधील सदस्याने कोणते बेकायदेशीर काम केले, तर त्याची जबाबदारीही ग्रुप अ‍ॅडमिनची असते. त्यामुळे ग्रुपच्या अ‍ॅडमिनला त्यांच्या ग्रुपमध्ये काय चालले आहे आणि कोणत्या प्रकारचा कंटेंट शेअर करण्यात येत आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे. नाहीतर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनच्या अडचणीत वाढ होऊन त्यांना तुरुंगात जावे लागू शकते.

कोणताही व्हिडिओ आणि फोटो लीक करू नका

कोणाच्याही परवानगीशिवाय कोणीही कोणाचे वैयक्तिक व्हिडिओ किंवा फोटो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर करू नये. असे करणे गुन्हा असले तरी तुमच्यावर कारवाई होऊ शकते. यासाठी ग्रुपचा अ‍ॅडमिन असण्याचीही गरज नाही.

चुकूनही अफवा किंवा खोट्या बातम्या शेअर करू नका

व्हॉट्सअ‍ॅपवर कोणत्याही प्रकारची अफवा किंवा फेक न्यूज शेअर करणे हा गुन्हा मानला जातो. तुमच्याविरुद्ध तक्रार किंवा कारवाई होऊ शकते. खोट्या बातम्या पसरवण्यासाठी आणि बनावट खाती तयार करण्यासाठी तुमचे खाते हटवले जाऊ शकते.

अश्लील मजकूर शेअर करणे टाळा

व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मजकूर शेअर करणे हे गुन्ह्याच्या कक्षेत येते. यात अयोग्य व्हिडिओ, फोटो किंवा चाइल्ड पोर्नोग्राफी यांचा समावेश असून ज्यामुळे तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.

देशविरोधी आशय शेअर करणे टाळा

जर तुम्ही असा कंटेंट व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर केला जो देशविरोधी आहे. तर तुमच्या समस्या वाढू शकतात. कारण नुकतेच, यूपीच्या बागपतमध्ये एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनिस्ट्रेटरला ‘देशविरोधी’ वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे.

हिंसा भडकवणारा मजकूर शेअर करू नका

हिंसेला प्रोत्साहन देणारा कोणताही धर्म किंवा अशी कोणतीही पोस्ट व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करू नका. तसेच असे चित्र, व्हिडिओ किंवा कोणतीही पोस्ट शेअर केली तर तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.