शेतकऱ्याचा नादखुळा ! विदर्भातल्या मातीत फुलवली स्ट्रॉबेरीची बाग; मिळवलं लाखोंचं उत्पन्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Strawberry Farming In Vidarbha : मराठवाडा आणि विदर्भ हे दोन्ही विभाग शेतकरी आत्महत्येसाठी कायमच चर्चेत राहतात. शेतकरी आत्महत्येचा या दोन्ही विभागाला कलंक लागला आहे. दुष्काळ, नापिकी यांसारख्या अनेक आव्हानांमुळे येथे शेती व्यवसाय हा राज्याच्या इतर विभागाशी तुलना केली असता अतिशय कठीण बनला आहे. या विभागात शेती करणे आणि पोट भरण म्हणजे अवघडच बाब आहे.

वारंवार नैसर्गिक आपत्तीमुळे येथील शेतकऱ्यांना शेतीमधून फारसं उत्पन्न मिळत नाही. परंतु असे असतानाही अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग याच विभागातून वारंवार समोर आले आहेत.

येथील शेतकऱ्यांनी आपल्या कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर, जिद्द आणि चिकाटीच्या सामर्थ्यावर असे काही नवनवीन प्रयोग केले आहेत की याची भुरळ सबंध महाराष्ट्राला पडली आहे. यामुळे जरी या विभागात शेतकरी आत्महत्येचा आलेख हा वाढताच असला तरी देखील येथील शेतकऱ्यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून राज्यातील इतर शेतकऱ्यांना मार्ग दाखवण्याचे काम केले आहे.

हे पण वाचा :- पुणे-मुंबई प्रवास होणार गतिमान ! देशातील सर्वात मोठा सागरी मार्ग ‘या’ दिवशी होणार खुला, प्रवाशांचा 90 मिनिटांचा वेळ वाचणार, वाचा सविस्तर

असाच एक प्रयोग आता गोंदिया जिल्ह्यातून समोर येत आहे. येथील एका शेतकऱ्याने चक्क महाबळेश्वर मध्ये उत्पादित होणारी स्ट्रॉबेरी उत्पादित करण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या गोंदिया जिल्ह्यातील या प्रयोगशील शेतकऱ्याचा डंका संपूर्ण महाराष्ट्रात वाजत आहे.

वास्तविक पाहता महाबळेश्वर मधील स्ट्रॉबेरी आता इतरही काही जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांनी उत्पादित करून दाखवले आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यातील हवामान तुलनेने स्ट्रॉबेरी पिकासाठी अधिकच प्रतिकूल असल्याचे चित्र आहे. मात्र तरीही गोंदिया शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चारगाव येथील प्रयोगशील शेतकरी संजय जसानी यांनी आपल्या शेतीत स्ट्रॉबेरी उत्पादित करून दाखवली आहे. संजय यांच्याकडे खरं पाहता 22 एकर शेत जमीन आहे.

हे पण वाचा :- State Employee Strike : ब्रेकिंग ! कर्मचाऱ्यांचा संप फुटला; आता ‘या’ मोठ्या संघटनेने संपातून घेतली माघार

यासोबतच त्यांचा शहरात एक व्यवसाय देखील आहे. शहरात ते सिमेंट आणि पाईपचा व्यवसाय चालवतात. सोबतच शेतीही करतात. आता त्यांनी आपल्या शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. संजय आपल्या 22 एकरात वेगवेगळे प्रयोग करतात. ते प्रामुख्याने भाजीपाला व ड्रॅगन फ्रुट सारख्या फळ पिकाची शेती करत आहेत.

दरम्यान त्यांनी आपल्या आता स्ट्रॉबेरी लावली असून यातून त्यांना जवळपास दीड टन उत्पादन मिळाले आहे. 200 ग्रॅम च्या बॉक्स पॅकिंग करून स्ट्रॉबेरीची सध्या विक्री सुरू आहे. या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून त्यांना आता लाखो रुपयांची कमाई होत असून भविष्यात स्ट्रॉबेरीचे पीक अधिक क्षेत्रावर घेण्याचे त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

हे पण वाचा :- काय सांगता ! सरकारी नोकरीच्या खाजगीकरणाचा ‘तो’ निर्णय महाविकास आघाडी सरकारचाच; विधानसभेत समोर आली मोठी…

वास्तविक गोंदिया जिल्हा हा धान उत्पादनासाठी संपूर्ण भारतात ओळखला जातो. पण धान उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना नानाविध अशा अडचणी येऊ लागल्या आहेत. या परिस्थितीत पर्यायी पिकाच्या शोधात शेतकरी आहेत. अशाच पर्यायी पिकाच्या शोधात असलेल्या संजय जसानी यांनी स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती गोंदिया सारख्या उष्ण हवामानात करून दाखवली आहे. निश्चितच विदर्भातील वऱ्हाडी मातीमध्ये केलेला हा प्रयोग राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक राहणार असून यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्यांचे वेगळेपण पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर : जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी सुरू झाले शासकीय हरभरा खरेदी केंद्र, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा