Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा दावा नुकताच केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. राहुल कुल हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. यामुळे याबाबत चौकशी होणार का असा प्रश्न अनेकांना पडला.
असे असताना राऊतांनी कुल यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राऊतांच्या विरोधात दौंडमध्ये मोर्चा निघाला होता. आता पुणे-सोलापूर महामार्गावर दौंडमध्ये आता राऊतांच्या आभारांचे बॅनर झळकल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

हे बॅनर कुणी लावले हे मात्र गुलदस्त्यात आहे. भाजपच्या नेत्याने देखील कुल यांच्यावर निशाणा साधला होता. आता या बॅनरवर कर नाही तर डर कशाला चौकशीला सामोरे जा, ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या वतीने जाहीर आभार, असे लिहिले आहे.
यामुळे हा बॅनर कोणी लावला याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशा आशयाचे बॅनर शेतकरी सभासदांनी दौंड शहरात ठिकठिकाणी लावले आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर देखील बॅनर लावले आहेत. बॅनरवर भीमा पाटसचे सुज्ञ शेतकरी असे म्हटले आहे. यामुळे चर्चा सुरू आहे.
दरम्यान, याचा तपास भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांनी करावा, अशी विनंती राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक आणि सहकार आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे. यामुळे आता याचा तपास होणार की नाही याची चर्चा सुरू झाली आहे.
या कारखानाच्या अध्यक्षपदी राहुल कुल आहेत. जे विशेषाधिकर समितीचेही अध्यक्ष आहेत. या समितीने संजय राऊतांना आतापर्यंत हक्कभंगाची नोटीस बजावली आहे. यामुळे राजकारण करून हे आरोप केले असल्याचे कुल यांनी म्हटले आहे.