50 Hajar Protsahan Anudan : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कायमच नाविन्यपूर्ण आणि शेतकरी हिताच्या योजना सुरू केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाते. गेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील आपल्या काळात अनेक नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक चर्चेची आणि ज्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे कौतुक केले जात होते ती योजना म्हणजे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना.
या योजनेच्या माध्यमातून गेल्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती. विशेष बाब म्हणजे या योजनेचा तत्कालीन सरकारने विस्तार केला आणि या योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.
हे पण वाचा :- पंजाबराव डख बोले तैसे ढग हाले ! सोशल मीडियावर चर्चा फक्त पंजाबरावांचीच….
मात्र तत्कालीन सरकारला हा निर्णय त्यांच्या कार्यकाळात अंमलबजावणी पर्यंत नेता आला नाही. वर्तमान शिंदे सरकारने मात्र हा निर्णय अबाधित ठेवत राज्यातील नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतच प्रोत्साहन अनुदान देण्याचे काम सुरु केले आहे. 2017 18, 2018 19, 2019 20 या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्ष नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या अंतर्गत अनुदान दिल जात आहे.
आतापर्यंत चार याद्या या योजनेच्या प्रसिद्ध झाल्या असून यामध्ये लाखो शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. दरम्यान चौथी यादी नुकतीच प्रसिद्ध झाली असून यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण केल्यानंतर अनुदानाची रक्कम प्रत्यक्ष वितरित केली जाणार आहे. अशातच मात्र शेतकऱ्यांचे काही प्रश्न देखील आहेत.
यामध्ये सर्वात विचारला जाणारा प्रश्न म्हणजे या योजनेसाठी पात्र ठरलेले मात्र मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना किंवा कुटुंबाला या योजनेअंतर्गत अनुदान मिळेल का? अन यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल. तर प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरलेल्या मात्र मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसदारांना किंवा कुटुंबाला या योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे.
यासाठी मात्र मृत झालेल्या लाभार्थ्यांच्या वारसांना मृत्यूचा दाखला सादर करावा लागणार आहे. यासोबतच आधार क्रमांक दुरुस्त करावा लागणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांना कृषी विभागाशी संपर्क साधावा लागणार आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करून संबंधित शेतकऱ्यांच्या वारसदारांना या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ मिळू शकतो असं सांगितले गेल आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; ‘या’ तारखेपर्यंत पाऊस अन गारपीट सुरूच राहणार, हवामान विभागाने जारी केला नवीन अंदाज, दिला गंभीर इशारा