Palakhi Marg Route Change : महाराष्ट्रात आगामी वर्षात विधानसभा निवडणुका आहेत शिवाय पुढील वर्षी लोकसभा निवडणुका देखील आहेत. यामुळे निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत.
नुकत्याच झालेल्या राज्य अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विद्यार्थी, कामगार, महिला, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, शेतकरी इत्यादींना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत तसेच काही योजनांची सुरवात देखील केली आहे. यासोबतच राज्यात रस्ते विकासाची प्रकल्प देखील जोरात सुरू आहेत.

वेगवेगळी महामार्गे, भूयारी मार्ग, उड्डाणपूल, सागरी पूल, कोस्टल रोड यांसारखी कामे प्रगतीपथावर आहेत. गेल्या महिन्यात राज्याला दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या असून आगामी काही महिन्यात आणखी वंदे भारत एक्सप्रेस राज्यात सुरू होणार आहे. म्हणजेच रस्ते मार्ग, लोहमार्ग इत्यादी दळणवळण व्यवस्था बळकट करण्यासाठी शासन, प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
या वेगवेगळ्या रस्ते महामार्ग प्रकल्पात पालखी मार्गाचा देखील समावेश होतो. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग असे दोन पालखी मार्ग तयार केले जातात सोडून या पालखी मार्गमुळे वारकऱ्यांना राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र देहू, आळंदी आणि पंढरपूर यादरम्यानची दळणवळण व्यवस्था सुधारणार आहे.
हे पण वाचा :- बीडच्या शेतकऱ्याचा परफेक्ट कार्यक्रम! ‘या’ जातीच्या दोडक्याची अर्धा एकरावर लागवड केली, तब्बल अडीच लाखांची कमाई झाली, पहा कसं होत नियोजन?
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच हा पालखी मार्ग पुढील एका वर्षात पूर्णत्वास येईल अस आश्वासन दिल आहे. हे दोन पालखी मार्ग पुण्यातील देहू येथून आणि आळंदी येथून विठुरायाच्या नगरीला, पंढरपूरला जोडणार आहेत. दरम्यान आता या पालखी मार्गाच्या रूट मध्ये बदल करण्याची मागणी केली जात आहे. पालखी मार्गामुळे छत्रपती सहकारी साखर कारखाना परिसराचे मोठे नुकसान होत आहे.
यासंदर्भात राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक साखर कारखाना संचालक मंडळास अनेक पत्रे लिहिली. हा पालखी मार्ग बदलण्यासाठी सूचित केल. पण याला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान आता ज्याच्याक यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असून हा पालखी मार्ग बदलण्याची यावेळी विनंती त्यांनी केली आहे.
हे पण वाचा :- 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मृत झालेल्या लाभार्थ्याच्या कुटुंबाला मिळणार का? वाचा याविषयी सविस्तर
यासंदर्भात त्यांनी नितीन गडकरी यांना पत्र दिले आहे. जाचक सांगतात की कारखान्याच्या सभासदांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे इत्यादी राजकारणातील अति महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. मात्र तरीही पालखी मार्ग बदलला जात नाही यामुळे इतर सभासदांनी यामधून काय बोध घ्यायचा हा सवाल उपस्थित होत आहे. निश्चितच जाचक यांनी पालखी मार्ग बदलण्याची मागणी गडकरी यांच्याकडे केली असल्याने आता यावर खरच काही निर्णय होतो का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.