St Employee News : एसटी महामंडळाच्या माध्यमातून एसटी मधील वाहन आणि चालकांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरं पाहता एसटी वाहन आणि चालकांना आतापर्यंत तयार गणवेश दिला जात होता. मात्र आता महामंडळाने या वाहन आणि चालकांना वर्षाला दोन जोडी गणवेशासाठी कापड आणि पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मराठी नवीन वर्षात वाहन आणि चालक यांना नवा कोरा गणवेश मिळणार असल्याचे चित्र आहे.
निश्चितच ही राज्यातील एसटी महामंडळाच्या वाहन आणि चालक या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बाब असून या महामंडळाच्या निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाहन आणि चालकांना दिल्या जाणाऱ्या कापडासाठी महामंडळाकडून टेंडर प्रक्रिया काढण्यात आली आहे.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज ! ‘या’ तारखेला मुसळधार पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यात राहणार अवकाळी?, पहा….
यामुळे लवकरच एसटी मधील कर्मचाऱ्यांना आता नवाकोरा गणवेश शिवून घेता येणार आहे. खरं पाहता एसटी महामंडळ गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडले आहे. विशेषता कोरोना काळापासून एसटीचा प्रवास प्रवाशांनी टाळला आहे. यामुळे एसटी महामंडळ आर्थिक तंगीत असून याचा फटका कर्मचाऱ्यांना देखील बसत आहे.
महामंडळाचे उत्पन्न कमी झाले असल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही पण नुकताच शासनाने एक मोठा निर्णय घेत एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न निकाली काढला आहे. आता एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना लवकरच गणवेश देखील मिळणार आहे.
हे पण वाचा :- नोकरीला भारी शेती ! पुण्याच्या शेतकऱ्याचा कोथिंबीर लागवडीचा प्रयोग यशस्वी; अर्धा एकरात एक लाखाची कमाई
निश्चितच गणवेश द्यायला थोडा उशीर झाला आहे पण टेंडर प्रक्रिया सुरू झाली असल्याने आगामी काही दिवसात कर्मचाऱ्यांना आता दोन जोडी कापड आणि पाचशे रुपये शिलाई दिली जाणार आहे. खरं पाहता एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्याला तयार गणवेश नको तर त्या ऐवजी कापड द्या अशी मोठी मागणी केली होती.
कर्मचाऱ्यांची ही मागणी शासनाने मान्य करत कर्मचाऱ्यांना दोन जोडी कापड वर्षाला आणि पाचशे रुपये शिलाई देण्याचा निर्णय घेतला आहे. निश्चितच मराठी नूतन वर्षात एसटी कर्मचारी नव्या कोऱ्या गणवेशात आपली सेवा बजावताना पहावयास मिळणार आहेत.
हे पण वाचा :- शेतकऱ्याचा सूर्यफूल लागवडीचा प्रयोग ठरला फायदेशीर; 3 महिन्यात झाली 2 लाखांची कमाई