Sanjay Raut : संजय राऊतांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी, ‘या’ नेत्याची केली निवड

Published on -

Sanjay Raut :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. संजय राऊत यांना शिवसेना पक्षाच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आलेलं आहे. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी आता शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आलेली आहे.

यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र लिहून ही माहिती दिलेली आहे. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई शहरात शिवसेना कार्यकारीणीची एक बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये एकमतानं ठराव झाला की, संजय राऊत इथून पुढे संसदेतील शिवसेना पक्षाचे नेते नसतील.

तसेच त्यांच्याऐवजी गजानन किर्तीकर यांची या पदावर निवड व्हावी. आमच्याकडे बहुमत असल्याने, संजय राऊत यांना या पदावरून दूर करावे, असे या पत्रात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच किर्तीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

असे असताना यानंतर आता संसदीय नेतेपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. शिवसेना हे नाव आणि शिवसेना हे चिन्ह मिळाल्यानंतर आता दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. यावर अजून संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवले आहे. यामुळे आता ठाकरे गट अजूनच आक्रमक होण्याची शक्यता आहे. सध्या यामुळे राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe