Gajanan Kirtikar : काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला ५० जागा सोडण्याबाबत विधान केले हेाते. यामुळे मोठा राडा झाला होता. यावर शिवसेना नेते आक्रमक झाले होते. यावर आता शिंदे गटाच्या नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे.
याबाबत आता शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, लोकसभेला २२, विधानसभेला १२६ जागा आमच्या आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. काही जागांची अदलाबदल होईल, पण आकडे बदलले जाणार नाहीत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना काय कमजोर नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, भाजप आणि शिवसेना आम्ही २०१९ मध्ये युती करून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत.
विधानसभेला शिवसेना १२६ जागा, तर १६२ जागा भाजप लढली आहे. लोकसभेला भाजपला २६, तर आम्हाला २२ जागा मिळाल्या होत्या. तो फॉर्म्युला कायम राहिला पाहिजे, असेही ते म्हणाले. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ते म्हणाले, आम्ही एवढे दिवस राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक होतो. पण मधल्या काळात आम्ही फारकत घेतली होती. मात्र, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा प्रतिनिधी ’एनडीए’मध्ये जावा, यासाठी संजय राऊत यांची हकालपट्टी करून माझी संसदीय नेतेपदी नेमणूक करण्यात आली, असेही ते म्हणाले.