पारनेर :- विखे साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे एफआरपीप्रमाणे सत्तर कोटी थकवले असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे यांचे बंधू व प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष अशोक विखे यांनी केला.
राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखालील संस्थांत शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात डॉ. अशोक विखे साेमवारपासून लोणी येथे उपोषणास करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अर्धा तास भेट घेऊन चर्चा केली. नंंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राधाकृष्ण यांच्यावर टीका केली.
उपोषण करू नये असे पत्र लोणी पोलिसांनी दिले. मात्र, राधाकृष्ण यांनी परवानगी नाकारल्याची अफवा पसरवली. हजारे यांनाही त्याचे वाईट वाटले.
अशोक विखेंच्या नेमक्या मागण्या काय आहेत?
- प्रवरानगर, गणेश, राहुरी या कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळावेत
- झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनने प्रवरा मेडिकल ट्रस्टला दिलेल्या देणग्यांची चौकशी करावी
- जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीतील गैरप्रकारसंबंधी तपासणी समितीचा अहवाल जाहीर करून संबंधितांवर कारवाई व्हावी
- जिल्हा परिषदेत २००४ ते २००९ या काळात झालेल्या शालेय पोषण आहारातील गैरप्रकाराची चौकशी करावी.
- श्रीरामपूरच्या मुळा-प्रवरा वीज वापर संस्थेतील अपहाराची चौकशी करावी, या संस्थेला सरकारकडून मिळालेली रक्कम सभासदांच्या खात्यात जमा करावी