मोठी बातमी! परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांना कृषी भूषण पुरस्कार मिळणार? पहा

Ajay Patil
Published:
Punjab Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh Krushi Bhushan Puraskar : राज्यातील शेतकऱ्यांमध्ये हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख हे नाव विशेष लोकप्रिय बनले आहे. गेल्या काही वर्षांपासून डखं राज्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज देत आहेत. डख यांचा अंदाज राज्यातील लाखो शेतकऱ्यांना व्हाट्सअप च्या माध्यमातून दिला जातो. शिवाय त्यांचे यूट्यूब चैनल देखील आहे.

यूट्यूब च्या माध्यमातून देखील त्यांचा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी वर्तवलेल्या अंदाज शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. शेतकऱ्यांच्या मते, डख यांचा अंदाज हवामान विभागापेक्षा अधिक योग्य असतो. त्यांचा हवामान अंदाज कधीच खोटा ठरत नाही.

हे पण वाचा :- खुशखबर! शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली ‘इतकी’ वाढ; शासनाचा मोठा निर्णय, किती वाढणार पगार, पहा…

यामुळे त्यांना शेती करताना सोयीचे होत असून पावसामुळे होणारे नुकसान टाळता येते. दरम्यान आता पंजाबराव डख यांना कृषी भूषण पुरस्कार देण्याची मागणी दूरध्वनी विभागले आहे. शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी केलेल्या लोकांना कृषी भूषण पुरस्कार दिला जातो.

अशा परिस्थितीत पंजाबरावांना देखील कृषी भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत मात्र अजून कोणताच निर्णय झालेला नाही. परंतु शेतकऱ्यांनी डख यांना हा पुरस्कार मिळावा अशी मागणी केली आहे. दरम्यान आज आपण डख यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- कौतुकास्पद! संकटात सापडलेल्या बळीराजासाठी पोलिसांचा अभिनव उपक्रम; खाकी वर्दीच्या ‘धाराशिव पॅटर्न’ची अख्या राज्यात चर्चा, उपक्रमाचे डिटेल्स पहा

पंजाबराव डख यांच्या विषयी थोडक्यात

डख हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज सांगत असतात. त्यांच्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा गाढा विश्वास असला तरी देखील हवामान तज्ञांकडून कायमच डख यांच्या हवामान अंदाजावर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. डक हे परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगाव येथील रहिवासी आहेत. ते स्वतः शेतकरी कुटुंबातून आले आहेत.

लहानपणापासून हवामानाविषयी आवड असल्याने त्यांनी हवामानाचा अभ्यास केला आहे. हवामान अंदाज वर्तवण्याबरोबरच डखं आजही शेती करतात. ते आपल्या दहा एकर जमिनीत हरभरा सोयाबीन यांसारख्या पिकांची शेती करत आहेत.

डख यांच शिक्षण किती झाल आहे?

डखं यांनी बीएपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ अंशकालीन शिक्षक म्हणून सेवा बजावली आहे. यासोबतच त्यांनी उपग्रहांचा अभ्यास केला असून ईटीडी आणि सीटीसी याचे शिक्षण देखील घेतले आहे.

हे पण वाचा :- पुणे, मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! Pune-Mumbai थेट विमानसेवा ‘या’ दिवशी सुरू होणार; असे राहणार तिकीट दर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe