Panjabrao Dakh Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरूच आहे. काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले रब्बी हंगामातील पीक या अवकाळी आणि गारपिटीमुळे क्षतीग्रस्त झाले आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तुरळक ठिकाणी मात्र अजूनही पाऊस सुरुच आहे.
पण राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाची उघडीपं आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा शेती कामाचा वेग वाढला आहे. शेतकरी बांधव रब्बी हंगामातील काढणी योग्य पिकांची सध्या स्थितीला काढणी करत आहेत. अशातच मात्र आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चीर परिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; महाराष्ट्रात यंदा उष्णतेची लाट, महापुर आणि दुष्काळ पडणार, आता ‘या’ संस्थेने दिला गंभीर ईशारा
या अंदाजात डख यांनी पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपली शेतीची कामे करणे आवश्यक राहणार आहे. डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार आज पासून 27 मार्च पर्यंत राज्यात पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे. 25 मार्च, 26 मार्च आणि 27 मार्च रोजी पडणारा हा पाऊस फक्त पूर्व विदर्भातच राहणार आहे.
अक्कलकोट, देगलूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, नागपूर या भागात या कालावधीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उर्वरित राज्यात ढगाळ हवामान कायम राहणार असल्याचा अंदाज डख यांनी बांधला आहे. तसेच राज्यात 28, 29 आणि 30 मार्च रोजी हवामान कोरडे राहणार आहे. यानंतर पुन्हा एकदा 31 मार्च आणि एक एप्रिल 2023 रोजी पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्याचा नाद नाही करायचा ! वर्ध्याच्या युवा शेतकऱ्याने शेतात बनवलं फाइव्ह स्टार मचान; पंचक्रोशीत रंगली एकच चर्चा,…
यानंतर दोन एप्रिल ते पाच एप्रिल पर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे. या कालावधीमध्ये मात्र शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घेणे आवश्यक राहणार आहे. कारण की, पाच एप्रिल नंतर राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होणार आहे. 5 एप्रिल पासून राज्यातील हवामान मोठ्या प्रमाणात बदलेल आणि पुन्हा एकदा राज्यात मोठ्या पावसाची शक्यता आहे.
5 एप्रिल, 6 एप्रिल आणि 7 एप्रिल रोजी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. या कालावधीमध्ये पडणारा पाऊस हा राज्यात सर्वदूर पडणार असून मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी दोन एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान शेतीची राहिलेली कामे पूर्ण करून घेणे गरजेचे राहणार आहे.
हे पण वाचा :- संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आता ‘हे’ काम करावं लागणार, नाहीतर….