Devendra Fadnavis : : ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाला साधला आहे. नाशिकमध्ये बोलताना राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आज उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कितीतरी वेळेस मस्जिदमध्ये जाऊन माथा टेकला आहे. याचे आमच्याकडे फोटोही आहेत. यांच्या पापाचा घडा भरत चालला आहे, असे म्हणत विनायक राऊत यांनी टीका केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.
विनायक राऊत यांच्या या टीकेला भाजप आणि फडणवीस काय उत्तर देणार हे पाहण महत्वाचे असणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये सभा होत आहे. या सभेसाठी ठाकरे गटाचे नेते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर राज ठाकरे यांनी अनेक आरोप केले आहेत. यामुळे आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
या सभेकडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष आहे. दिल्लीतून फोन येत आहेत. रेकॉर्डब्रेक शब्दही कमी पडेल. अशा पद्धतीने या सभेची तयारी सुरू असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यामुळे सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.