Natural Gas Price : गॅसच्या किमती पुन्हा वाढणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, जाणून घ्या कशा ठरतात गॅसच्या किमती

Ahmednagarlive24 office
Published:

Natural Gas Price : देशात दिवसेंदिवस महागाईचा पारा वाढतच चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमती लागतात वाढत आहेत. पण आता पुन्हा एकदा गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच देशात उत्पादित नैसर्गिक वायूच्या किमती मर्यादित करण्याचा विचार करू शकते. माहितीनुसार सरकार सीएनजी आणि खत कंपन्यांसाठी इनपुट खर्च नियंत्रणात ठेवण्याचा हेतू आहे.

वर्षातून दोनदा, सरकार देशात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत ठरवते, जी नंतर वाहनांमध्ये वापरण्यासाठी सीएनजीमध्ये आणि घरे आणि खत कंपन्यांमध्ये वापरण्यासाठी पीएनजी आणि एलएनजीमध्ये रूपांतरित केली जाते.

किंमती दोन सूत्रांनुसार ठरवल्या जातात

नैसर्गिक वायूच्या किमती सरकारकडून दोन वेळा दोन सूत्रांनी ठरवल्या जातात. जुने गॅस फील्ड जिथून गॅस काढणे अगदी सोपे आहे, त्यातून निघणाऱ्या गॅसच्या किमती वेगळ्या असतात आणि दुसरे म्हणजे नवीन गॅस फील्ड जिथून गॅस काढणे कठीण आहे, त्यांच्या किमती वेगळ्या पद्धतीने निश्चित केल्या जातात.

सध्या सरकारकडून जुन्या गॅस फील्डमधून बाहेर पडणाऱ्या गॅसची किंमत $8.57 प्रति एमएमबीटीयू ठरवण्यात आली आहे तर नवीन गॅस फील्डमधून बाहेर पडणाऱ्या गॅसची किंमत $12.46 प्रति एमएमबीटीयू आहे.

सरकार मर्यादा ठरवू शकते

सरकारकडून लवकरच सर्वसामान्यांना मोठी दिली जाणायची शक्यता आहे. कारण आता सरकारकडून देशात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत १ एप्रिल रोजी पुन्हा ठरवल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडून गॅसच्या किमती कमी केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जुन्या गॅस फील्डमधून बाहेर पडणाऱ्या गॅसची किंमत प्रति एमएमबीटीयू $ 10.7 पर्यंत पोहोचू शकते, तर नवीन गॅस फील्डमधून बाहेर पडणाऱ्या गॅसच्या किमतीत काही बदल होऊ शकतात.

गॅसचे दर वाढू शकतात?

आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा आर्थिक झटका बसण्याची शक्यता आहे. सरकारकडून पुन्हा एकदा गॅसच्या किमती वाढवल्या जाऊ शकतात. गेल्या वेळी सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ केली होती.

तेव्हापासून आजतागायत सीएनजीसह घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या किमती ७० टक्क्यांनी वाढल्या आहेत. १ एप्रिल रोजी गॅसच्या दरात बदल झाल्यास पुन्हा एकदा गॅसच्या दरात वाढ होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe