मुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील टोल दरात ‘या’ दिवसापासून होणार मोठी वाढ, पहा किती लागणार आता टोल

Ajay Patil
Published:
mumbai news

Mumbai Pune Expressway Toll Rate : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरं पाहता आता मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास महागणार आहे. राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे यादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. कामानिमित्त, शिक्षणानिमित्त, अन पर्यटन निमित्त या दोन्ही शहरात प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता या शहरा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

आता या शहरा दरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर प्रवास करताना प्रवाशांना अधिकचा खर्च करावा लागणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेळेवर तब्बल 18% अधिकचा टोल प्रवाशांना द्यावा लागणार आहे. त्यामुळे निश्चितच प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.दरम्यान हा वाढीव टोल दर एक एप्रिल 2023 पासून प्रवाशांकडून आकारला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘त्या’ प्राध्यापकांच्या वेतनवाढीचा प्रश्न लागला मार्गी, शासन निर्णय जारी; आता ‘इतकं’ वाढणार मानधन,…

वास्तविक टोल दरात वाढ ही ठरलेलीच आहे. कारण की, 2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील टोलमध्ये दर तीन वर्षांनी वाढ केली जाईल. यानुसार आता टोल दरात वाढ होणार आहे.

एक एप्रिल 2020 मध्ये टोल दरात वाढ झाली होती आणि आता पुन्हा तीन वर्षानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार टोल दरात वाढ होणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सध्या असलेल्या टोल दारात 50 ते 70 रुपयांपर्यंतची वाढ होणार आहे. मात्र आता लागू झालेले टोल दर 2030 पर्यंत कायम राहतील अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून एका प्रतिष्ठित मिडिया रिपोर्टला देण्यात आली आहे.

हे पण वाचा :- शिक्षकांसाठी खुशखबर ! ‘त्या’ शाळांना मिळणार 20% अनुदान, तब्बल 63 हजार शिक्षकांच्या वेतनात होणार वाढ

किती वाढणार टोल दर

एक एप्रिल 2023 पासून, चार चाकी वाहनांना 320 रुपये, टेम्पो ला 495 रुपये, ट्रक 685 रुपये, बस 940 रुपये, थ्री एक्स एल १६३०, एम एक्स एल 2165 रुपये इतका टोल आकारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकंदरीत आता मुंबई पुण्याचा प्रवास महागणार आहे.

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मार्गांवरील मेट्रोची चाचणीही झाली यशस्वी; आता ‘त्या’…

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe