कोरोना विषाणूला हरवण्यासाठी देशभरात लॉकडाउन लागू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील अनेक डॉक्टर, नर्स आणि वृद्ध लोकांशी सातत्याने संपर्ग साधत आहेत.
शनिवारी पंतप्रधान मोदींनी अचानक बिहारचे माजी आमदार चंद्रमौली मिश्रा यांच्याशी फोनवर सम्पर्ग साधत परिस्थितीची चौकशी केली. सकाळी ९.३० च्या दरम्यान भभुआचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रमौली मिश्रा हे वर्तमानपत्र वाचत असताना त्यांचा फोन वाजला. पलीकडून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतोय असा आवाज आल्यानन्तर चंद्रमौली मिश्रा प्रचंड खुश तसेच भावुकही झाले.
पंतप्रधानांनी यावेळी लॉक डाऊन विषयी तसेच कोरोनाशी संबंधित गोष्टींशी चर्चा केली. पंतप्रधानांनी त्यांच्या तब्येतीबद्दलही चौकशी केली. पीएम मोदी यांनी चंद्रमौली मिश्रा यांच्याशी सुमारे चार मिनिटे चर्चा केली.
पीएम मोदींशी बोलल्यानंतर चंद्रमौली मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली की ” त्यांच्यासारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला, जो जवळजवळ चाळीस वर्षे पक्षाची सेवा करत आहे, यांना पंतप्रधानांचा फोन येऊ शकतो याविषयी कल्पनाही केली नव्हती. कॉल आल्यानंतर मी खूप खुश होता. माझ्यासाठी हा आयुष्यातील सर्वोत्तम दिवस आहे.”