अहमदनगर Live24 :- काष्टी सेवा संस्थेतील गैरव्यवहार व व्यापारी कमिशन साखळी उघड केल्याच्या रागातून ज्येष्ठ संचालक भगवानराव पाचपुते, त्यांचा मुलगा प्रताप यांच्यासह सहा ते सात जणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार व्यवस्थापक जालिंदर पाचपुते यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात सोमवारी केली.
तक्रारीत म्हटले आहे, गेल्या काही महिन्यांत संस्थेच्या कारभारात भगवानराव यांचे चिरंजीव प्रताप यांचा काहीही संबंध नसताना हस्तक्षेप वाढला आहे. काही विभागांतील खरेदीत त्यांनी मोठा गोंधळ केला आहे.
अनेक व्यापारी व कंपनीचे पत्रव्यवहार प्रताप यांच्या नावेच होत आहेत. संस्थेला साहित्य पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांकडून कमिशन आणले जाते. त्याबद्दल काही पुरावे असून, प्रताप यांच्या बँकखात्यात व्यापाऱ्यांनी पैसे जमा केले आहेत.
भगवानराव पाचपुते यांच्या कानावर ही बाब घातल्यानंतर त्यांनी शिवीगाळ व दमदाटी केली. गैरव्यवहार उघड केल्याच्या रागातून पगारातही कपात केली. हे सगळे उघड केल्यानंतर प्रताप पाचपुते व त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी मारहाण केली.
गोंधळाची चर्चा बाहेर केली, तर जीवे मारण्याची धमकी दिली. प्रताप व त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्या बदनामीची मोहीम हाती घेतली असूल, चारित्र्यहनन करणारे चुकीची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकण्याचा दबाब टाकत गप्प बसण्यास भाग पाडत आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®