MLA Porn Videos : सध्या त्रिपुरात पुन्हा एकदा भाजपचे सरकार आले आहे. असे असताना विधानसभा अधिवेशन सुरू असताना खुर्चीवर बसून भाजपचा आमदार पोर्न व्हिडीओ पाहत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजपवर यामुळे टीका केली जात आहे.
या प्रकरणानंतर हा आमदार तर ट्रोल होत आहे. तसेच या प्रकारामुळे भाजपचीही चांगलीच नाचक्की झाली आहे. त्रिपुरातील बागबासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जादब लाल नाथ हे विधानसभा सुरू असताना पोर्न व्हिडीओ पाहताना दिसून येत आहेत. जादब लाल नाथ विधानसभेत आपल्या जागेवर बसले होते.

ते मोबाईलवर पोर्न व्हिडीओ पाहताना दिसत असल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामुळे आता कारवाईची मागणी केली जात आहे. जादब लाल नाथ यांनी त्यांच्यावरील आरोप अजून नाकारलेला नाही. यावर अजून त्यांनी कोणत्याही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. आमदाराच्या व्हिडीओमुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. विरोधी नेत्यांनी याबाबत आवाज उठवला आहे. यामुळे आता ते राजीनामा देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, जादब लाल नाथ हे बागबासा विधानसा मतदारसंघातील आमदार आहे. भाजपने 2023 च्या निवडणुकीत जादब लाल नाथ यांना तिकीट दिले होते. तिकीट मिळाल्यानंतर जादब लाल नाथ यांनी विजयी होण्याची संधी साधली. आता मात्र ते अडचणीत आले आहेत.