नागपूरमध्ये नोकरीची संधी! एअर इंडिया एअर सर्विसेसकडून ‘या’ पदासाठी भरती जाहीर, 10वी पास उमेदवारांनाही नोकरीची संधी, थेट मुलाखतीने होणार निवड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Air India Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या आणि उपराजधानी नागपूर मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस नागपूरकडून मोठी भरती आयोजित झाली आहे. विविध रिक्त पदांसाठी ही भरती आयोजित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी राहणार आहे.

विशेष म्हणजे या भरतीच्या माध्यमातून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करणे प्रस्तावित आहे. म्हणजेच या भरतीसाठी लेखी परीक्षा किंवा इतर परीक्षा राहणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या भरतीची अधिसूचना नुकत्याच काही दिवसांपूर्वी काढण्यात आली असून आज आपण या भरती संदर्भात आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- ब्रेकिंग! स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केली मोठी भरती; ‘या’ लोकांना नोकरीची संधी, जाहिरात पहा

कोणत्या आणि किती पदासाठी होत आहे भरती?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एअर इंडिया एअर सर्विसेस नागपूर यांच्या माध्यमातून तब्बल 145 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, ड्यूटी ऑफिसर 04 जागा, ज्युनियर ऑफिसर – पॅसेंजर 01 जागा, ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल 02 जागा, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 16 जागा, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 18 जागा, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 06 जागा, हँडीमन 98 जागा या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

हे पण वाचा :- यंदा उन्हाळी कांदा शेतकऱ्यांना बनवणार मालामाल! ‘या’ कारणामुळे दरात तेजी राहू शकते, जाणकारांचा अंदाज 

केव्हा होणार मुलाखत?

या वर नमूद केलेल्या पदांसाठी थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही मुलाखत तीन एप्रिल 2023 रोजी सुरू होणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या दिवशी मुलाखत राहणार आहे. तसेच ही मुलाखतीची प्रक्रिया 7 एप्रिल 2023 पर्यंत कायम राहणार आहे. यामुळे नेमक्या कोणत्या पदासाठी कोणत्या दिवशी मुलाखत आहे हे जाणून घेण्यासाठी अधिसूचना एकदा काळजीपूर्वक वाचणे अपेक्षित आहे. हॉटेल आदि प्लॉट क्रमांक: 05, इंडियन ऑइल पेट्रोल पंप जवळ विमानतळ रोड नागपूर 440025 इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीला हजर राहण्याचे आवाहन केले जात आहे. या ठिकाणी विशेष बाब अशी की, मुलाखतींना जाताना उमेदवारांना खर्चाचे वहन स्वतःला करावे लागणार आहे.

भरतीची अधिसूचना किंवा जाहिरात कुठे पाहणार?

एअर इंडिया एअर सर्विसेस नागपूर कडून काढण्यात आलेल्या या भरतीची जाहिरात पाहण्यासाठी https://drive.google.com/file/d/1_N6aW60PueA5OyKkrvSct9tts_I1zGR4/view या लिंक वर क्लिक करा.

मित्रांनो, या पदभरती संदर्भात इतर आवश्यक सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आपण वर दिलेल्या लिंक वर जाऊन अधिसूचना पाहू शकता. अधिसूचनेत दिलेल्या पात्रता धारक उमेदवारांनीच या भरतीअंतर्गत होणाऱ्या मुलाखतीस हजर राहावे. तसेच जर आपणास एअर इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची असेल तर आपण http://www.aiasl.in/ या लिंकवर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकणार आहात.

हे पण वाचा :- एल निनो खरच भारतीय मान्सूनवर परिणाम करणार का? यंदा दुष्काळ की सुकाळ, पहा काय म्हणताय तज्ञ