PM Awas Yojana : देशात आजही असे गरीब नागरिक आहेत ज्यांच्याकडे पक्के घर नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून अशा नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी मदत म्हणून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांची मदत दिली जात आहे.
जर तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण आता सरकारकडून पंतप्रधान आवास योजनेची पहिली यादी जाहीर केली आहे. तसेच अर्जदारांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना
२०१५ मध्ये केंद्र सरकारकडून पंतप्रधान आवास योजना सुरु करण्यात आली आहे. गरीब नागरिकांना पक्के घर बांधण्यास मदत करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. नागरिकांचे पक्की घरे बांधणायचे स्वप्न आता या योजनेमार्फत पूर्ण होणार आहे.
आजही जे लोक झोपडपट्टी किंवा कच्च्या घरामध्ये राहत आहेत त्यांना मदत करून पक्की घरे बांधून देण्याच्या उद्देशाने सरकारकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडून २.५ लाख रुपये दिले जातात.
आवश्यक कागदपत्रे
जर तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो.
आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदार ओळखपत्र
मोबाईल नंबर
मोबाईल क्रमांकासह बँक खाते लिंक करा
पासपोर्ट आकाराचा फोटो
असे तपासा यादीत तुमचे नाव
सर्वप्रथम, तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना Pmayg.Nic.In ची अधिकृत वेबसाइट उघडा.
आता तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटचे होम पेज उघडेल.
यानंतर तुम्हाला “प्रधानमंत्री आवास योजना पेमेंट लिस्ट 2022-23” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, नाव, राज्य आणि जिल्हा आणि तुमच्या पंचायतीचे नाव निवडावे लागेल आणि खाली दाखवलेला “सबमिट” पर्याय निवडावा लागेल.
सबमिट पर्यायावर क्लिक केल्यावर, प्रधानमंत्री आवास योजना 2022-23 च्या सर्व लाभार्थ्यांची यादी तुमच्या समोर येईल.
आता तुम्हाला त्या यादीत तुमचे नाव तपासावे लागेल, जर तुमचे नाव या यादीत असेल तर काही काळानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात या योजनेची रक्कम मिळेल.
निधी मिळाल्यानंतर, तुम्ही तुमचे घर बांधण्याची प्रक्रिया सुरू करू शकता.
वर दिलेल्या सर्व पायऱ्या फॉलो करून, तुम्ही तुमचे नाव पीएम आवास योजना यादी 2022-23 मध्ये पाहू शकता, जर तुमचे नाव या यादीत नसेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या संबंधित कार्यालयात जाऊन त्याबद्दल माहिती मिळवू शकता.