बळीराज संकटात….कांद्याने आणले बळीराजाच्या डोळयांत पाणी !

Ahmednagarlive24 office
Published:
onion45632_201808125691

Krushi news : गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकरी वर्गाच्या डोक्यावर अस्मानी संकट असतानाच कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना कांद्यातून उत्पन्न मिळण्याऐवजी खिशातून पैसे घालण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात कमालीची घसरण होत असल्याने बळीराजाच्या हाती काहीच लागत नाही.

कांद्याला नीचांकी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारभाव वाढण्यासाठी तसेच निर्यातीला चालना मिळण्यासाठी सरकारने तात्काळ पाऊल उचलण्याची गरज असल्याचे मत कांदा उत्पादक व्यक्‍त करत आहेत.

कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने कांदाउत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले असून, शेतातील कांद्याच्या नुकसानीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कांद्याच्या उत्पादनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामातील पेरणीसाठीच्या खर्चासाठी सावकाराकडून उसणवारी करण्याची वेळ आली आहे.

पारनेर तालुक्‍यातील सुपा परिसरात पाणी असणाऱ्या शेतशिवारातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली होती कांद्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाले. मात्र, आज रोजी बाजारात कांद्याचे दर गडगडले आहेत.

पुढील काळात कांद्याची मागणी वाढेल, अशी अपेक्षा बाळगून कांद्याची साठवण करण्याचा प्रयत्न काही शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतू बाजारात दर मिळत नसल्याने कांदा साठवता येईना ब फेकताही येईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बाजारात उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात कमालीची घसरण होत असून, एक नंबर कांदा ७०० ते ८०० रुपये प्रतिक्िटिल तर दोन व तीन नंबरच्या कांद्याला दोनशे ते तीनशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यामुळे बाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अशा बिकट परिस्थितीत शासनाने कांदा उत्पादकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातन होत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe