श्रीगोंदा : मुली घराबाहेर सुरक्षित नाहीत, असं म्हंटले जाते पण जन्मदात्या बापाकडूनच आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार होत असतील, तर मुली घरातही सुरक्षित राहिलेल्या नाहीत.
आपल्या पोटच्या १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या पित्यानेच अत्याचार केल्याची घटना दि.२५एप्रिल शनिवारी रात्री पीडित मुलीच्या घरी घडली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नराधम बापाविरोधात अत्याचार व पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचे गांभीर्य ओळखून श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तात्काळ नराधम बापाला जेरबंद केले आहे. सदर घटनेबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की,
शनिवार दि.२५ रोजी पीडित मुलीची आई व भाऊ हे शेजारी त्यांच्या नातेवाईकाचे मूल रडत असल्यामुळे त्यांच्याकडे गेले होते तर पीडित मुलीचा बाप हा मी घराच्या गच्चीवर झोपायला जातो असे सांगून घराच्या आतील खिडकीच्या मागे लपून बसला.
पीडित मुलीचे आई व भाऊ घराबाहेर गेल्यानंतर पीडित मुलगी घराचा दरवाजा बंद करून झोपली. त्यानंतर खिडकीच्या मागे लपून बसलेल्या बापाने रात्री दोन वेळेस पोटच्या या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.
सदर मुलगी झाल्या प्रकारामुळे प्रचंड घाबरली सकाळी आई घरी आल्यानंतर तिने झालेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने पीडित मुलीला घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये येऊन नराधम बापाविरोधात तक्रार दिल. त्यानंतर पोलिस निरीक्षक जाधव यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घरत सदर आरोपीस काही वेळातच जेरबंद केले. सदर घटनेमुळे मात्र सगळीकडे खळबळ उडाली आहे.